Monday, 1 September 2025

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

         जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.

            आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह ७/१२ उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक नामदार संजय सावकारे ,  उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले आहे .

            केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे

.०००००००००००

जिल्हास्तरीय लोकशाही दिनात ७३ अर्ज प्राप्त

 



















       जळगाव, दि. १ सप्टेंबर, २०२५ (जिमाका वृत्तसेवा) –  जिल्हास्तरीय लोकशाही दिन आज  अल्पबचत भवन,  येथे अपर जिल्हाधिकारी विजय कुमार ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आजच्या लोकशाही दिनात एकूण 73 अर्ज प्राप्त झाले.

            या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी  जयश्री माळी, तहसीलदार डॉ.उमा ढेकळे, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी,

            लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी विविध प्रश्नांसंदर्भात अर्ज सादर केले असून, त्याचे तात्काळ निराकरण करण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना  या वेळी निर्देश देण्यात आले. प्राप्त अर्जांचा विभागवार आढावा घेऊन अर्जांवर  कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.

                                          000000000

परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू

             जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नविन नोंदणी एमएच-११/ईएस ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.

            ज्या वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत अर्ज जमा करावेत. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.

             आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर  पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक आहे. या पावतीची विधीग्राह्यता ही फक्त १८० दिवस राहील अधिक माहितीसाठी, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव. येथे संपर्क साधावा.

00000000000