जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)- प्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांची नविन नोंदणी एमएच-११/ईएस ०००१ ते ९९९९ पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकानव्ये कळविले आहे.
ज्या
वाहन धारकांना आपल्या नविन वाहनांकरीता आकर्षक किंवा पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित
करावयाचा असल्यास त्यांनी परिवहन कार्यालयात २ व ३ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत
अर्ज जमा करावेत. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहीत
केलेल्या शासकीय शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी (DD उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,
जळगाव यांचे नावे) तसेच वाहन ज्यांच्या नावाने नोंदणी करावयाचे आहे. त्यांचा पत्ता
पुरावा व आधारकार्डशी सलग्न मोबाईल क्रमांक सादर करणे बंधनकारक आहे.
आकर्षक क्रमांकाचे पावती प्राप्त झाल्यावर पावती ही वितरकाकडे वाहन नोंदणी करणेकामी देणे बंधनकारक
आहे. या पावतीची विधीग्राह्यता ही फक्त १८० दिवस राहील अधिक माहितीसाठी, सहा. प्रादेशिक
परिवहन अधिकारी प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव. येथे संपर्क साधावा.
00000000000
No comments:
Post a Comment