Monday, 1 September 2025

शेतकऱ्यांनी वेळेत ई-पिक पाहणी पूर्ण करावी – पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांचे आवाहन

         जळगाव दि. १ (जि मा का वृत्त)-   हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत दरानुसार राज्यात कडधान्य व तेलबियांची खरेदी करण्यात येणार आहे. नाफेड व NCCF च्या वतीने ही खरेदी प्रक्रिया राज्यातील पणन महासंघामार्फत पार पाडली जाणार असून, यात मुंग, उडिद, सोयाबीन व तुर या पिकांचा समावेश आहे.

            आधारभूत दराने विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांना ई-पिक पाहणीसह ७/१२ उतारा आवश्यक राहणार आहे. संपूर्ण खरेदी प्रक्रिया ही पारदर्शक, कार्यक्षम आणि पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार असल्याचे मंत्री तथा पणन महासंघाचे संचालक नामदार संजय सावकारे ,  उपाध्यक्ष रोहित निकम आणि संचालक संजय पवार यांनी सांगितले आहे .

            केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाने दिलेल्या कालावधीत आपल्या पिकांची ई-पिक पाहणी पूर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांनी केले आहे

.०००००००००००

No comments:

Post a Comment