Friday, 29 August 2025

भटके विमुक्त समाज सन्मानार्थ सन्मान दिवस म्हणून 31 ऑगस्ट रोजी आयोजन

             जळगाव, दि. २९ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) सन 1871 साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या  जातीमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले.  स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना  विमुक्त जाती   ( म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले.

            भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट दिवस भटके विमुक्त दिवस  साजरा करण्यात येणार आहे.

            दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता के. सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज,  नॅशनल हायवे 6 आय एम आर कॉलेज जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांस नागरीकांना उपस्थित राहावे,  असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगांव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

No comments:

Post a Comment