जळगाव दि. 18 ( जिमाका वृत्तसेवा ) - नशिराबाद गावाचे आता झपाट्याने शहरात रूपांतर होत आहे. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग या दळणवळणाच्या सुविधेमुळे शहराचा मोठा विकास नजिकच्या काळात होईल. चार कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेली अत्यंत सुंदर नवी नगरपरिषद ही या शहराच्या विकासाचा मोठा आधार ठरेल असे सांगून आज शहरातील 14 कोटी रुपये कामाचे लोकर्पण आणि 8 कोटीच्या नव्या कामाचे भूमीपूजन झाले आहे. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा उत्तम होण्यासाठी मदत होणार असून नशिराबाद करांच्या मागाणु नुसार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. नशिराबाद नगरपरिषद नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.
पालकमंत्री
गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पिण्याचे पाण्यासाठी आणि रस्त्यावरील दिव्या साठी
आता मंजूर केलेल्या 110 केव्हीच्या सोलार प्रकल्पातून
12 महिन्यातील 10 महिने शून्य आकार पडणार असल्यामुळे हा खूप मोठा खर्च नगर परिषदेचा
वाचणार आहे. हा पैसा इतर विकासाच्या कामासाठी वापरला जाईल केवळ अठरा महिन्यात अत्यंत
गुणवत्तापूर्ण नगर परिषद बांधली असून या इमारतीच्या वर एक मोठे सभागृह बांधण्यासाठी
येणाऱ्या काळात निधी देऊ शहरासाठी भूमीगत गटारे, लागतील तिथे पुल दिले आहेत. त्यामुळे
शहराच्या विकासाला गतीदेण्यासाठी सर्व गोष्टी पूरक आहेत. आता सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी
काम करा. जिथे आवश्यकता आहे तिथे आपण असल्याचे सांगून 60.57 कोटी च्या भुयारी गटार योजनेला सुरुवात झालेली असून
वाघुर नदीवरून फिल्टरसह शहराला पाणीपुरवठा योजनेचे काम देखील प्रगतीत असल्याचे पालकमंत्री
गुलाबराव पाटील यांनी नशिराबादकरांना आश्वासीत केले.
नगरपरिषदेचे
मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात शहरात झालेल्या कामाची आणि
होऊ घातलेल्या कामाची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले .
यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,
नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे,
माजी
महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद
पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवराज पाटील,
विकास धनगर, जि.प. चे माजी सदस्य पंकज महाजन, जि.प. चे माजी सदस्य पंकज महाजन,
सा.बां .चे शाखा अभियंता श्री. रायसिंग़ चेअरमन
योगेश पाटील, बापू बोढरे , किर्तीकांत चौबे , असलंम सर, रमेशअप्पा पाटील, किरण पाटील
, कंत्राटदार नितीन बर्हाटे, जितेंद्र महाजन
, सुकलाल कोळी, शालिक कोळी, शहरातील मान्यवर
नागरिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी
मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीतील
अनेक दालनांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
लोकार्पण ठळक कामे
नवीन नगरपरिषद योजना अंतर्गत ४ कोटी
रुपयांची नवीन फर्निचर सह प्रशासकीय इमारत बांधकामाचे लोकार्पण झाले. हायवेला लागून
शहरातील मुख्य रस्त्यावर उभारलेल्या भव्य अशा प्रवेशद्वाराचे लोकार्पण देखील करण्यात
आले. तसेच विशेष रस्ता अनुदान योजना 2023 - 24 अंतर्गत दत्त नगर, लक्ष्मी नगर, साई समर्थ नगर, नाज
नगर, प्रभाग क्र. १ ते १० या भागांसह शहरातील अनेक वस्तीमध्ये रस्त्यांचे कॉक्रिटीकरण,
पेव्हरब्लॉक बसविणे आणि गटारी बांधकामाची कामे एकूण ४३७.११ लक्ष रुपयांच्या खर्चाची
कामांचे लोकार्पण करण्यात आले.
भूमीपूजन ठळक कामे
नशिराबाद
परिसरात एकूण ८१० लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होत आहे. जिल्हा नियोजन समिती
अंतर्गत ३६० लक्ष रुपयांत महिला बचत गट सक्षमीकरणासाठी व्यापारी संकुल, नवीन प्रशासकीय
इमारतीपासून नॅशनल हायवेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण तसेच ११० केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प
उभारण्यात येणार आहे. तर विशिष्ट नागरी सेवा योजनेतून ४५० लक्ष रुपयांत दत्तनगर - मुक्तेश्वर
नगर रस्ता काँक्रीटीकरण, पेठ - भवानीनगर जोडणारा पूल आणि लेवा पाटील समाजाकरिता सामाजिक
सभागृह उभारले जाणार आहे. या कामांमुळे नशिराबादच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे.
0000000000000
No comments:
Post a Comment