जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):- पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्हयात ७२,५६९ शेतक-यांनी या योजनेत भाग घेवुन ७६,२४२.८५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असुन शेतकरी हिस्सा पोटी रुपये ६४.५५ कोटी रक्कम भारतीय कृषि विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आलेले आहे.
सदर योजनेत कमी तापमान व जादा तापमान या
घटकातंर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार शेतक-यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात
येते. सदर नुकसान भरपाई ठरविण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून प्राप्त अहवाल व निकषांव्दारे
शेतक-यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत अदा करण्यात येत असते. सदर नुकसान भरपाई
अदा करण्यासाठी जळगाव जिल्हयासाठी नियुक्त केलेल्या भारतीय कृषि विमा कंपनीला स्कायमेट
कंपनीकडून हवामान घटकांची माहे नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मधील कमी तापमानाची
आकडेवारी, माहे एप्रिल, मे २०२५ मधील जादा तापमानाची आकडेवारी ची माहिती अधिकृत/प्रमाणित
आकडेवारी अद्यापपावेतो केंद्र शासनाच्या पोर्टलवर प्राप्त झालेली नाही.
शेतक-यांना
नुकसान भरपाई देय होण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून हवमान धोके घटकांतर्गत नुकसानी संदर्भात
प्राप्त होणारी प्रमाणित केलेली माहिती व आकडेवारी ग्राहय धरली जात असल्याचे कृषि विभागाकडुन
प्रसिध्द करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
000000000000
No comments:
Post a Comment