Monday, 18 August 2025

जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर ; जिल्हा प्रशासन सतर्क

 










            जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – दि. 16 व 17 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मुसळधार पाऊस व विजेच्या तडाख्यामुळे जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतपिकांचे, घरांचे, जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे.

            प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महसूल व कृषी खात्याचे अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे सुरू केले आहेत. बाधित कुटुंबांना तात्पुरते निवारा, अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे.

             अमळनेर तालुका – पातोंडा व नांद्री गावांतील पारधी वस्त्यांना पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांना शाळा व स्थानिक भवनात हलविण्यात आले.

            भडगाव तालुका – कनाशी व बोरनार येथे कपाशीचे नुकसान, कोठली येथे ऊस पिकाचे नुकसान.

 रावेर तालुका – नागझिरी नाल्याला पूर; बक्षीपुर येथे घराची भिंत कोसळून सात-आठ शेळ्या दगावल्या.

            जळगाव तालुका – वडली जवखेडे व बोरनार-लमांजन शिवारात पिकांचे नुकसान.

 धरणगाव तालुका – कल्याणे खुर्द येथे नुकसान पाहणी.

 पारोळा व एरंडोल तालुका – विविध शिवारात पिकांची हानी.

 बोदवड तालुका – घरावर झाड कोसळून नुकसान; घरातील व्यक्तींना सौम्य दुखापत.

 पाचोरा तालुका – लासगाव, सामनेर येथे पीकनुकसानीची पाहणी.

            जिल्हा प्रशासनाने कळविले आहे की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

जिल्हा प्रशासन तत्पर

शासन ठामपणे आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे होतील.

मदत वेळेत व पारदर्शकपणे पोहोचविली जाईल.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी सातत्याने संपर्क ठेवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

००००००००००००


No comments:

Post a Comment