जळगाव दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) –महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. अहमद देशमुख आणि श्री. वसीम शेख हे मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी जामनेर, जि. जळगाव येथे दौऱ्यावर येत आहेत.
सकाळी १०.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून
खासगी वाहनाने ते जामनेरकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता जामनेर येथे पोहोचून
तेथील घटनेतील मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन मौजे जामनेर
येथे झालेल्या घटनेसंदर्भात चर्चा करतील.
दुपारी २.०० वाजता जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे
प्रयाण करणार आहेत.
No comments:
Post a Comment