Thursday, 22 April 2021

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 26 एप्रिल रोजी ऑनलाईन आयोजन

            जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 22 - समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.

            त्यानुषंगाने तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार, 26 एप्रिल, 2021 रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आलेला आहे. महिलांच्या काही तक्रारी असल्यास सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे cdpo01jalgaon@gmail.com या ईमेलवर दाखल करण्यात याव्यात. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालय, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

00000

No comments:

Post a Comment