Friday, 29 August 2025

भटके विमुक्त समाज सन्मानार्थ सन्मान दिवस म्हणून 31 ऑगस्ट रोजी आयोजन

             जळगाव, दि. २९ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) सन 1871 साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या  जातीमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले.  स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना  विमुक्त जाती   ( म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले.

            भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट दिवस भटके विमुक्त दिवस  साजरा करण्यात येणार आहे.

            दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता के. सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज,  नॅशनल हायवे 6 आय एम आर कॉलेज जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांस नागरीकांना उपस्थित राहावे,  असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगांव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

Thursday, 28 August 2025

ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत

         जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) –"ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणांत संपूर्ण कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरण करणा-या लाभार्थिस थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ots) रावाविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार  लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे"

            महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुल यांचे जिल्हा कार्यालय जळगांव यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतर्गत जळगाव जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते.  विहित मुदत संपूर्ण गेली असताना थकित कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडुन करण्यात येत आहेत.

            याकरीता, महामंडळाच्या थकित लाभार्थीसाठी संपुण थकित कर्ज रक्मेच्या एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी परतावा (ots) योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेत (एक रककमी परतावा - ots) लाभ घेऊन सर्व संबधित लाभार्थीनी थकित मुददल व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व भविष्यात होणारी संभावित कायदेशिर कार्यवाही टाळावी, असे आवाहन मा. जिल्ह व्यवस्थापक, जळगांव यांनी केले आहे.

            अधिक माहिती साठी कार्यालयाचा पत्ता :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी, पहिला मजला, महाबळ रोड, सैनिक हॉल च्या पाठीमागे, जि. जळगांव फोन नं. ०२५७-२२६१९१८

00000000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांक ने सादर करण्यासाठी अर्ज (परीशीष्टे-१) उपलब्ध बाबत (सन २०२५-२६) (जाहीर सूचना)

पाणी वापर संस्थांना आवाहन

            महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा सन सन २०२५/२६ करीता अभियाना बाबत ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांकने सादर करण्यासाठी ऑनलाइन नामांकन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धेत सक्रीय सहभाग घ्यावा.

            सदर स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असुन या स्पर्धेसाठी अ) मोठे / मध्यम प्रकल्प आणि ब) लघु प्रकल्प / कोल्हापूर पध्दतीचे बंधारे / साठवण तलाव / कालवा / नदीवरील वैयक्तीक अथवा सहकारी उपसा अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय स्तरावर प्रथम व व्दितीय असे ४ पुरस्कार, तसेच प्रत्यके महामंडळाची भौगोलिक परीस्थती व सिंचन व्यवस्था वेगळी असल्याने पाच महामंडळ स्तरावर वरील दोन गटांमध्ये प्रथम व व्दितीय याप्रमाणे २० पुरस्कार असे एकत्रित २४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील, यावरील कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडुन नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ च्या आत नामांकने (प्रस्ताव) दाखल करावीत.

            सदर योजनेअंतर्गत सुधारणा करून राज्यस्तरीय दोन्ही गटामध्ये प्रथम व व्दितीय, प्रथम क्र.-रू ५ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू ३ लक्ष व प्रशस्ती पत्र असे एकुण चार पुरस्कार एकुण रक्कम-१६ लक्ष महामंडळ स्तरावर दोन्ही गटामध्ये महामंडळ स्तरावर पुरस्कार प्रत्येकी प्रथम क्र.रू-२ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू १ लक्ष व प्रशस्ती पत्र तसेच सिंचन व्यवस्थापन व पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे उत्कृष्ट काम करणारे उपअभियंता व त्यांच्या खालिल दर्जाचे अधिकारी व सिंचन कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील, पुरस्कार वितरण समारंभ दर वर्षी सिंचन दिनी २६ फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येतील स्पर्धा ५ वर्षा साठी राहील.

            तसेच सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन              मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश प्रदेश) यांनी केले आहे. सदर नामांकनासाठीचे (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. असे कार्यकारी अभियंता                 (अ.गि. कुलकर्णी) जळगांव पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000000

इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

                 जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – इस्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स (Home Based Health Care Giver Workers) या पदासाठी ५००० नोंकरीची संधी उपलब्ध झालेली असून, या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये साधारणतः किमान १० उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या रोजगाराच्या संधीसाठी पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय सक्षम नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पुर्ण असणे उपलब्ध, तसेच GDA/ANM/GNM/BSC Nursing/Post BSc Nursing अशाप्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती तसेच नमुद पदासाठी अर्ज करणेसाठी वरिल संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.

            तरी या संधीचा लाभ जळगाव जिल्हयातील अधिका- अधिक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७ - २९५९७९० यावर किंवा कार्यालयाचा पत्ता -  शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव.यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

            या दिवशी विविध विषयांवरील तक्रारींबाबत तक्रारदार प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहणार असून, संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य आहे.

            नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                          000000000000

Tuesday, 26 August 2025

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५

             जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्हयात ७२,५६९ शेतक-यांनी या योजनेत भाग घेवुन ७६,२४२.८५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असुन शेतकरी हिस्सा पोटी रुपये ६४.५५ कोटी रक्कम भारतीय कृषि विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आलेले आहे.

         सदर योजनेत कमी तापमान व जादा तापमान या घटकातंर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार शेतक-यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येते. सदर नुकसान भरपाई ठरविण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून प्राप्त अहवाल व निकषांव्दारे शेतक-यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत अदा करण्यात येत असते. सदर नुकसान भरपाई अदा करण्यासाठी जळगाव जिल्हयासाठी नियुक्त केलेल्या भारतीय कृषि विमा कंपनीला स्कायमेट कंपनीकडून हवामान घटकांची माहे नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मधील कमी तापमानाची आकडेवारी, माहे एप्रिल, मे २०२५ मधील जादा तापमानाची आकडेवारी ची माहिती अधिकृत/प्रमाणित आकडेवारी अद्यापपावेतो केंद्र शासनाच्या पोर्टलवर प्राप्त झालेली नाही.

                शेतक-यांना नुकसान भरपाई देय होण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून हवमान धोके घटकांतर्गत नुकसानी संदर्भात प्राप्त होणारी प्रमाणित केलेली माहिती व आकडेवारी ग्राहय धरली जात असल्याचे कृषि विभागाकडुन प्रसिध्द करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000000

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे जनरेट करणे बाबत

        जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे ऑनलाईन जनरेट करणे कामी भुसावळ शहर येथील लाभार्थी यांनी तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत आधार कार्ड, बॅकेचे पासबुक, मोबाईल घेऊन कार्यालयामध्ये इत्यादी कागदपत्रे सादर करावे, असे  नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शहर  भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले  केले आहे.

०००००००००००

Monday, 25 August 2025

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. अहमद देशमुख व श्री. वसीम शेख यांचा जळगाव जिल्हा दौरा

             जळगाव दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) –महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य श्री. अहमद देशमुख आणि श्री. वसीम शेख हे मंगळवार, दि. २६ ऑगस्ट २०२५ रोजी जामनेर, जि. जळगाव येथे दौऱ्यावर येत आहेत.

            सकाळी १०.०० वाजता छत्रपती संभाजीनगर येथून खासगी वाहनाने ते जामनेरकडे प्रयाण करतील. दुपारी १२.०० वाजता जामनेर येथे पोहोचून तेथील घटनेतील मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतील. त्यानंतर दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत बैठक घेऊन मौजे जामनेर येथे झालेल्या घटनेसंदर्भात चर्चा करतील.

दुपारी २.०० वाजता जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करणार आहेत.

                                                          00000000000

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कारासाठी अर्ज मागविण्याचे आवाहन

             जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): - महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास साधावा, जनतेला दर्जेदार ग्रंथालयीन सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार तसेच भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

            राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून अ, ब, क आणि ड वर्गात अनुक्रमे एक लाख, पंच्याहत्तर हजार, पन्नास हजार आणि पंचवीस हजार रुपयांची रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय, राज्यस्तरावर एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये, तर प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एका कार्यकर्ता आणि एका सेवकाला प्रत्येकी पंचवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट प्रदान करण्यात येईल.

            सन २०२४-२५ या वर्षासाठी या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक ग्रंथालये, ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवकांनी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतीत आपल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.

            या पुरस्कारामुळे राज्यातील वाचन संस्कृतीचा प्रसार होत असून ग्रंथालयीन सेवांच्या गुणवत्तेत लक्षणीय वाढ होत असल्याचे गाडेकर यांनी नमूद केले आहे.

00000000000

शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद, जळगावकडून ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’

             जळगाव, दि. २५ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):- जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळविण्यासाठी जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी विभागामार्फत एक नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना कमी खर्चात आणि सुलभ पद्धतीने सेंद्रिय शेती करता यावी, यासाठी ‘स्लरी फिल्टर युनिट योजना’ हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शेतकऱ्यांना या युनिटच्या खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देणार आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

            स्लरी फिल्टर युनिट हे उपकरण सेंद्रिय शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. हे उपकरण मुख्यत्वे ड्रिप किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणालीशी जोडले जाते. या यंत्राद्वारे शेण, गोमूत्र आणि इतर सेंद्रिय घटकांचा वापर करून तयार करण्यात आलेले जीवामृत फिल्टर केले जाते आणि पिकांपर्यंत समान प्रमाणात पोहोचवले जाते. या प्रक्रियेमुळे केवळ पिकांची उत्पादनक्षमता वाढत नाही तर जमिनीची सुपीकताही सुधारते. तसेच, रासायनिक खतांवरील खर्चातही लक्षणीय घट होते. पशुधनातून निर्माण होणारी स्लरी योग्य पद्धतीने गाळून या यंत्राद्वारे उच्च प्रतीचे सेंद्रिय द्रवरूप खत तयार करता येते, ज्यामुळे पिकांच्या गुणवत्तेतही सुधारणा होते.

            कृषी विकास अधिकारी श्री. पद्मनाभ म्हस्के यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत स्लरी फिल्टर युनिटच्या क्षमतेनुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. ५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१०,७५०, ५०१ ते ११०० लिटर क्षमतेसाठी ₹१४,००० तर १३०० ते १५०० लिटर क्षमतेच्या युनिटसाठी ₹१८,००० इतके अनुदान मिळणार आहे.

            या योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारण्याची मुदत २५ ऑगस्ट २०२५ ते ५ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत पंचायत समिती स्तरावरील कृषी विभागाकडे अर्ज दाखल करावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे. अर्ज करताना शेतकऱ्यांनी ७/१२ उतारा, ८अ उतारा, जनावरे असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी किंवा पशुधन पर्यवेक्षकांचे प्रमाणपत्र, अग्रीस्टॅंक नोंदणी पत्र, बँक पासबुकची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स, जात प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. 

            सेंद्रिय शेतीमुळे उत्पादन खर्चात बचत होत असून जमिनीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मोठी मदत मिळते. त्यामुळे जिल्हा परिषदेने सुरू केलेली ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद, जळगावच्या कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

0000000000000

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 25 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, सोमवार दिनांक  25 ऑगस्ट, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

            सोमवार दिनांक 25 ऑगस्ट, 2025  रोजी सकाळी 10.00 वाजता  पाळधी येथून शासकीय वाहनाने वरगव्हाण ता. चोपडा कडे प्रयाण, सकाळी 10.45 वाजता वरगव्हाण येथे शाम मास्तर यांचेकडे सात्वंनपर भेट, सकाळी 11.00 वाजता धरणगाव येथे नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.45 वाजता पाळधी ता. धरणगाव कडे प्रयाण व राखीव, दुपारी 1.00 वाजता पाळधी ता. धरणगाव येथुन जळगाव विमानतळाकडे प्रयाण, दुपारी 2.15 वाजता जळगाव येथुन आय.सी. 5606 या प्लाय 91 विमानाने पुणे कडे प्रयाण,

000000000000

Thursday, 21 August 2025

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजना बाबत बैठक

             मुंबई, दि. २१: अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण केलेल्या आव्हानांना न घाबरता आपली पावले टाकत आहे. आपल्या मालासाठी पर्यायी बाजारपेठ शोधून अमेरिकेने लादलेल्या टॅरीफ आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

            या आपत्तीला संधी मानून राज्याच्या ' इज ऑफ डूईंग बिझनेस' मध्ये १०० बदल करण्यात यावेत. ' इज ऑफ डूइंग बिजनेस' धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र ' वॉर रूम' ची निर्मिती करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.

            मुख्यमंत्री म्हणाले, ' इज ऑफ डूईंग बिझनेस' साठी निर्माण करण्यात येणाऱ्या वॉर रूमचा दर महिन्याला आढावाही घेण्यात येईल. राज्यामध्ये खाजगी औद्योगिक पार्कसाठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यात यावे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ औद्योगिक वसाहतींच्या बाहेर असे औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी स्पष्ट धोरण आणावे. यामध्ये लघु आणि मध्यम उद्योगांचा प्राधान्याने अंतर्भाव असावा.  त्यातून उद्योजकांना उद्योगासाठी लागणारे परवाने तातडीने मिळतील, अशी व्यवस्था असावी.   यामुळे राज्यात निश्चितच उद्योगांच्या माध्यमातून समृद्धी येऊन रोजगार निर्मितीमध्ये वाढ होईल.

नवीन उद्योगांबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या विकासासाठी शासन निश्चितच सकारात्मक आहे. उद्योगांच्या परवानग्यांसाठी असलेल्या सिंगल विंडो पोर्टलला अधिक सक्षम करण्यात यावे. जेणेकरून परवानग्यांना वेळ लागणार नाही.  राज्यात पाच हेक्टर क्षेत्रावरील कृषी प्रक्रिया किंवा कृषीवर आधारित उद्योगांसाठी कुठल्याही परवानगीची आवश्यकता असू नये, यासाठी यंत्रणा कार्यान्वित करावी. ' इज ऑफ डूइंग बिजनेस'साठी वेळोवेळी कायद्यात सुधारणा करण्यात येतात. या सुधारणांबाबत खालील यंत्रणांना अवगत करावे. उद्योग येण्यासाठी व सद्यस्थितीत असलेल्या उद्योगांना विकसित होण्यासाठी प्रत्यक्षात बदल होतील, असेच ' रिफॉर्म' करण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

शहराजवळ स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना विविध परवानगी घ्याव्या लागतात. परवानग्या मिळण्याचा कालावधी कमीत कमी करून सदर परवानग्या सुलभरीत्या मिळतील याची व्यवस्था करावी. उद्योगासाठी लागणाऱ्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया वेगाने करण्यात यावी. पर्यावरणाला हानी न पोहोचवणाऱ्या उद्योगांचे प्रदूषणाबाबतच्या दंडाची फेर आकारणी करून कुठेही अतिरिक्त दंड आकारला जात नाही, याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यावेळी म्हणाले.

            बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंग परदेशी, भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य सल्लागार (निवृत्त) अपूर्व चंद्रा, मा. मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, राज्य कर, वस्तू आणि सेवा कर आयुक्त आशिष शर्मा, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव अंशू सिन्हा, कामगार विभागाच्या प्रधान सचिव  आय. ए. कुंदन, उद्योग विभागाचे सचिव डॉ . पी. अनबलगन, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज,  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरसु, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, आयआयटी मुंबईचे अध्यक्ष डॉ. शरद कुमार सराफ आदी उपस्थित होते.

' इज ऑफ डूइंग बिजनेस' साठी राज्याने केलेल्या सुधारणा

            उद्योगांना उद्योग सुरू करण्यासाठी अग्निशमन परवाना बारमाही कालावधीसाठी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य, उद्योगाच्या सुसूत्रीकरणासाठी मैत्री कायदा 2023 पारित, उद्योगांच्या वीज जोडणी साठी मैत्री सिंगल विंडो सिस्टीम कार्यान्वित, केवळ दोन कागदपत्रे नवीन वीज जोडणीसाठी आवश्यक, उद्योगांना बांधकामासाठी बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम कार्यान्वित, एमआयडीसीकडून भूखंड मिळवण्यासाठी मिलाप (इंडस्ट्रियल लँड अप्लिकेशन अँड अलॉटमेंट पोर्टल) पोर्टल कार्यान्वित.

या करण्यात येणार सुधारणा

            उद्योग स्थापण्यास भूखंडांची तातडीने व्यवस्था करण्यासाठी लँड बँकेची निर्मिती, भूखंड वितरण प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान करणार, पर्यावरणीय परवानगी 60 दिवसांमध्ये देण्याची व्यवस्था करणार, जिल्हास्तरावर गुंतवणूक वाढविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करून सक्षम करणार, निर्यात वाढविण्यासाठी ' डेडिकेटेड एक्सपोर्ट पोर्टल' तयार करणार, समूह विकासातून उद्योगांच्या निर्माण सठी एक तालुका एक समूह विकास उपक्रम राबविणार.

0000000000000

 

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव, दि. 21 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती  रक्षा निखिल खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा पुढील प्रमाणे.

            शुक्रवार दि 22 ऑगस्ट रोजी  आज सायंकाळी 7.00 वाजता त्या मुंबई विमान तळावरून जळगावकडे प्रयाण करतील. 8.40 वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल.  9.00 वाजता रस्तेमार्गे मुक्ताईनगरकडे प्रयाण करतील व रात्री मुक्कामी मुक्ताईनगर येथे राखीव.

0000000000

वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा

         जळगाव दि. 21 (जिमाका वृत्तसेवा) – वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, यांचा आज जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे.

            रात्री 12.30 वाजता  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन येथून महानगरी एक्सप्रेसने भुसावळकडे प्रयाण, सकाळी 6.45 वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्थानक येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण.  सकाळी  7.15  वाजता निवासस्थान  भुसावळ येथे आगमन व राखीव         

०००००००००००

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्हा दौरा

        जळगाव, दि. 21 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा): -  महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांचा आज, गुरुवार दिनांक  21 ऑगस्ट, 2025  रोजी जळगाव जिल्हा दौरा होत आहे.

            गुरुवार दिनांक 21 ऑगस्ट, 2025  रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबई येथून खाजगी वाहनाने  पाळधी ता. धरणगांव जि.जळगाव कडे प्रयाण.  दुपारी 2 .30 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगाव येथे आगमन व राखीव.

000000000000

Wednesday, 20 August 2025

अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई – मिठाईचा रुपये २४,१३०/- चा साठा जप्त

         जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवार, दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी शिरसोली प्र.न., जळगाव येथील मे. चौधरी स्वीट्स अँड नमकीन या ठिकाणी धाड टाकण्यात आली.

            सदर ठिकाणी पेढा, बुंदी लाडू, म्हैसूर पाक, गोड गावा आदी मिठाईचे उत्पादन कमी दर्जाचे व अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांना अपुरे असल्याचे आढळून आले. या ठिकाणाहून नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून उर्वरित १५१ किलोग्रॅम मिठाईचा एकूण रुपये २४,१३०/- किमतीचा साठा जप्त करून नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.

            ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कि. आ. साळुंके, प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी श्री. आकाश बोहाडे, श्री. योगराज सुर्यवंशी, सौ. आकांक्षा खालकर व सौ. पद्मजा कढरे यांनी सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, जळगाव श्री. संतोष कृ. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

            जिल्ह्यातील अस्वच्छ वातावरणात तयार होणाऱ्या मिठाई व इतर अन्न पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) श्री. संतोष कृ. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

00000000000

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) – २०२४ चा निकाल जाहीर

         जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)– महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ परीक्षेचे आयोजन दि. १० नोव्हेंबर, २०२४ रोजी करण्यात आले होते. परीक्षेतील पेपर क्र. । (इ. १ ली ते इ. ५ वी स्तर) व पेपर क्र. ॥ (इ. ६ वी ते इ. ८ वी स्तर) चा अंतिम निकाल दिनांक १४ फेबुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आलेला आहे. सदर परीक्षेत पात्र उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्र त्या त्या जिल्हयाचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्हा परिषद / शिक्षण मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयाकडे हस्तपोहोच देण्यात येत आहे.

            शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शिक्षण निरीक्षक मुंबई (उ/द/प) यांचे कार्यालयात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२४ पात्र उमेदवारांच्या प्रमाणपत्राचे वाटप दिनांक ०१ ते ०८नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत केले जाणार आहे. पात्रता धारक उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या वेबसाईट वरील सूचना वाचून आवश्यक त्या मूळ कागदपत्रांसह ज्या जिल्हयात परीक्षा दिली तेथील जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / शिक्षण निरीक्षक मुंबई  (उ/द/प) यांचे कार्यालयाशी स्वतः संपर्क साधून आपले प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. असे आयुक्त अनुराधा ओक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे – यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

                                                      0000000000

एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील दुर्देवी घटना

             आज दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी अंदाजे १२.३० वाजता, वरखेडी, तालुका एरंडोल, जिल्हा जळगाव येथे ही घटना घडली. शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी वन्यप्राण्यांपासून बचाव करण्याच्या उद्देशाने विजेच्या तारांचा वापर करण्यात आला होता. त्यामध्ये आलेल्या विद्युत धक्क्यामुळे दोन लहान मुले, दोन महिला आणि एक पुरुष अशा मिळून ५ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी व पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत.

00000000000

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५चा निकाल जाहीर

            जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा)  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC–TBC) जून २०२५ चा निकाल दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल परीक्षार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध आहे. तसेच परीक्षार्थी स्वतःचे गुणपत्रक ऑनलाईन प्रिंट स्वरुपात घेऊ शकतात.

            जून २०२५ मध्ये ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. इंग्रजी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा १८ ते २४ जून २०२५ दरम्यान झाली, तर मराठी व हिंदी ३० व ४० श.प्र.मि. विषयांची परीक्षा ३० जून ते ४ जुलै २०२५ दरम्यान घेण्यात आली होती.

            निकालासोबत विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे व गुणपत्रके डिजीटल स्वाक्षरीसह ऑनलाईन स्वरुपात संस्थांच्या लॉगीनवर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संस्थांनी ही प्रमाणपत्रे १०० जीएसएम (GSM) कागदावर रंगीत प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करावीत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना PDF सॉफ्ट कॉपी देखील द्यावी, जेणेकरून भविष्यात गरजेनुसार प्रमाणपत्राची छपाई करता येईल.

            निकाल जाहीर झाल्यानंतर १० दिवसांच्या आत परीक्षार्थ्यांनी गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुणपडताळणीसाठी प्रति विषय १०० रुपये व छायाप्रतीसाठी ४०० रुपये या प्रमाणे शुल्क आकारण्यात आले आहे. ही रक्कम दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन भरता येईल. प्राप्त उत्तरपत्रिकेनंतर पाच दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी प्रति विषय ६०० रुपये शुल्क भरून अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

            या संदर्भातील सर्व सविस्तर माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, इच्छुकांनी ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावेत, असे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त सौ. अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.एरंडोल तालुक्यातील वरखेडी येथील दुर्देवी घटना

0000000000

आदिवासी क्षेत्रातील मत्स्यव्यवसाय वृद्धीसाठी "धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" सुरू

         जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) – आदिवासी क्षेत्रांचा शाश्वत विकास साधण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत "धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" (DAJGUA) ही सहयोजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश आदिवासी गावांमध्ये पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार व मत्स्यव्यवसाय वृद्धींगत करून जीवनमान उंचावणे हा आहे.

            या योजनेअंतर्गत साधारणपणे १०,००० समुदाय व १,००,००० वैयक्तिक लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येणार असून त्यात अनुसूचित जमातींचे लाभार्थी, अविकसित क्षेत्रे व आदिवासी बहुल गावे यांचा प्राधान्याने समावेश आहे. अर्थसहाय्याच्या बाबतीत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान व १० टक्के हिस्सा स्वतःचा असा लाभ मिळणार आहे. यात ६० टक्के केंद्राचा आणि ४० टक्के राज्य शासनाचा हिस्सा असेल.

            योजनेत मत्स्यसंवर्धन तलाव बांधकाम, नवीन मत्स्यसगोपन तलाव, इन्सुलेटेड वाहन, मोटारसायकल सह आईस बॉक्स, तीनचाकी वाहन सह आईस बॉक्स, फिश किऑस्क, जलाशयात मत्स्यबोटुकली संचयन, पिंजरा मत्स्यसंवर्धन, तसेच प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमांचा समावेश आहे.

            जळगाव जिल्ह्यात या योजनेसाठी १२ आकांक्षित तालुक्यातील ११२ गावे निवडण्यात आली असून, जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, जळगाव यांनी केले आहे. इच्छुकांनी जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

0000000000

मराठी भाषा विभागामार्फत “अभिजात मराठी माझ्या अपेक्षा” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

         मुंबई, दि. २० : केंद्र शासनाच्या  ३ ऑक्टोबर २०२४ च्या अधिसूचनेन्वये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस तर ३ ते ९ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे.

            अभिजात मराठी भाषा सप्ताह मध्ये मराठी भाषा विभागातर्फे मराठी भाषा दूत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा जगभरातील १८ ते २१ वयोगटातील मराठी बोलणाऱ्यांसाठी खुली असेल. अभिजात मराठी-माझ्या अपेक्षा या विषयावर जास्तीत जास्त तीन मिनिटांचा वेळ प्रत्येक स्पर्धकाला देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे संयोजन ऑगस्ट मीडिया या संस्थेतर्फे केले जाईल. ही वक्तृत्व स्पर्धा ८ ते २२ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. महाराष्ट्रातील वेगवेगळे महसूल विभाग तसेच बृहन्महाराष्ट्र मिळून प्रथम नोंदणी करणाऱ्या १००० स्पर्धकांना प्रवेश मिळेल.

            स्पर्धकांनी विषयाचे आकलन करून तो विषय आपल्या पद्धतीने मांडणे अपेक्षित आहे. यामधून जास्तीत जास्त १०० उत्तम स्पर्धकांची निवड मराठी भाषा दूत म्हणून करण्यात येईल. तसेच, सर्व सहभागींना महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. यासाठी गुगल फॉर्म पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५, रात्री १२ पर्यंत आहे.

            या स्पर्धेसाठी १८ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त युवकांनी ऑनलाईन स्पर्धेमध्ये https://forms.gle/NYvWxvYCSFXCjkzn9 या लिंकवर नोंदणी करावी, असे आवाहन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले आहे.

००००००००००

हतनूर धरणाचे 20 गेट उघडले ; 1 लाख 24 हजार क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात ▪ नदी काठच्या गावांना दिल्या सतर्कतेच्या सूचना

         जळगाव दि. २० ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) - हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरण पातळीत वाढ होत असल्याने दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता हतनूर धरणातून ३५१७ क्युमेक्स (१२४२०३ क्युसेक्स) इतका प्रवाह नदीपात्रात सोडण्यात आला आहे. यासाठी धरणाची एकूण २० गेट पूर्णपणे उघडण्यात आली आहेत, अशी माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली.

   नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्या बाबतचे निर्देश दिले आहेत.याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदारांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याचेही सांगण्यात आले.

0000000000000

Tuesday, 19 August 2025

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर – १०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

         जळगाव दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) परीक्षा २०२५ चा निकाल सोमवार दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेस एकूण २२८८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २११३०८ उमेदवारांनी परीक्षा दिली.

            सदर परीक्षा IBPS या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ३० मे २०२५ आणि २ जून ते ५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांतील ६० परीक्षा केंद्रांवर पार पडली होती.

            बी.एड. व डी.एल.एड. परीक्षेसंदर्भातील ताज्या आकडेवारीनुसार, बी.एड. परीक्षेचे १५७५६ व डी.एल.एड. परीक्षेचे १३४२, असे एकूण १७०९८ उमेदवार प्रविष्ठ (Appear) झाले होते. त्यापैकी बी.एड. – ९९५१ व डी.एल.एड. – ८२७, असे मिळून एकूण १०७७८ उमेदवारांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

            दरम्यान, ज्या उमेदवारांनी आवश्यक व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे निर्धारित मुदतीत परीक्षा परिषदेकडे सादर केलेली नाहीत अशा बी.एड. – ५८०५ व डी.एल.एड. – ५१५, असे एकूण ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे.

निकालासंबंधीची गुणयादी व गुणपत्रक (Score List & Score Card) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर www.mscepune.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. उमेदवारांनी आपले गुणपत्रक ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत डाउनलोड करून घ्यावे, असे परिषदेने कळविले आहे. विहित मुदतीपर्यंत  डाउनलोड न केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील आणि नंतर कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

०००००००००

ओबीसी, व्हीजे, एनटी व एसबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आधार व स्वयंम योजनेसाठी अर्ज करण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

        जळगाव, दि. १९ ऑगस्ट (जिमाका) – महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्ग (SBC) या घटकांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आणि पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

            शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी. अशा बारावीनंतरच्या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले तसेच एम.ए., एम.एस.सी. अशा पदवीनंतरच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेले (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळता) विद्यार्थी या योजनांसाठी अर्ज करू शकतात.

            योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी दि. २७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावेत, असे आवाहन सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव यांनी केले आहे.

                                                                        ०००००००००००

‘ पी.एम. सूर्यघर - मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत महाऊर्जामार्फत स्पर्धात्मक पारितोषिक योजना शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रोत्साहनपर स्पर्धा

         नाशिक, दि. 18: केंद्र शासनाच्या "पी.एम. सूर्यघर मुफ्त बिजली योजना" अंतर्गत राज्यातील शासकीय इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता प्रोत्साहनपर स्पर्धात्मक तत्वावर आधारित योजना महाऊर्जा मार्फत राबविण्यात येणार आहे. दिनांक 1 ऑगस्ट, 2025 ते 31 डिसेंबर, 2025 या कालावधीमध्ये जिल्ह्यांतील शासकीय इमारतींच्या सौरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण, प्रस्ताव सादरीकरण व प्रत्यक्ष अंमलबजावणी आदींद्वारे निवड करण्यात येणार आहे. यामध्ये प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाच लाख, तीन लाख आणि एक लाख रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. नाशिक विभागाने यामध्ये अग्रेसर राहावे, असे आवाहन महाऊर्जाचे नाशिक विभागीय महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री यांनी केले आहे. 

            या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शासकीय इमारतीसाठी पारेषण संलग्न सौर ऊर्जा प्रकल्प नेट मीटरींग सह 5 वर्षाच्या सर्व देखभाल व दुरुस्तीसह आस्थापित करावयाचे आहेत. स्पर्धेत भाग घेण्यासाठी विहित नमुन्यातील प्रपत्र संबंधीत जिल्हाधिकारी व विभागीय महाव्यवस्थापक महाऊर्जा यांना प्रमाणित करून पाठवावयाचे आहे. विहित नमुन्यातील प्रपत्र प्राप्त झाल्यावर महाऊर्जा मुख्यालय स्तरावर या प्रपत्राची छाननी करण्यात येईल. ज्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त इमारती सौर ऊर्जा प्रकल्पाच्या क्षमतेसह आस्थापित होतील अशा जिल्ह्यांची मॉडेल शासकीय जिल्हा म्हणून जाहीर करण्यात येतील. प्रथम तीन क्रमांकांना धनाकर्षासह सन्मानपत्र,  स्मृतीचिन्ह, सौरकंदील देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहितीही श्री. अग्निहोत्री यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

००००००००००००

भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाला वेग – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आढावा

 





            जळगाव दि. 19 (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांनी आज जळगाव जिल्ह्यातील महत्वाकांक्षी भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. या प्रकल्पामुळे जळगाव, जामनेर व पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधांचा मोठा दिलासा मिळणार आहे.

            भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाची एकूण किंमत रुपये ३५३३.०५ कोटी असून शासन निर्णय क्रमांक ९२४/प्र.क्र.४३६/२४/मो.प्र.१, दि. ८ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या पत्रान्वये सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. या योजनेतून जामनेर व पाचोरा तालुक्यातील ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांचे लाभक्षेत्र स्थिर केले जाणार असून एकूण ९८.३५ दलघमी पाणीसाठ्याचा उपयोग होणार आहे. त्याद्वारे जळगाव तालुक्यातील १३,९०४ हेक्टर क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळेल.

            प्रकल्पाचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. टप्पा-१ अंतर्गत जळगाव तालुक्यातील चिंचोली, कंडारी, उमाळे, पाथरी, धानवड, शिरसोली प्र. बो., दापोरे, जावखेडे, देव्हारी आदी २६ गावांतील १३,९०४ हेक्टर क्षेत्रास सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहेत. तर टप्पा-२ अंतर्गत ४४.५ किलोमीटर लांबीच्या उद्धरण नलिकेद्वारे व १८,४६७ अश्वशक्तीच्या पंपांद्वारे ९८.३५ दलघमी पाणी उचलून जामनेर तालुक्यातील २२ लघु व २ मध्यम, पाचोरा तालुक्यातील २० लघु व ३ मध्यम तसेच जळगाव तालुक्यातील २ लघु अशा एकूण ५ मध्यम व ४४ लघु प्रकल्पांमध्ये पाणी साठवले जाणार आहे. यामध्ये कांग प्रकल्पाची उंची वाढ, गोलटेकडी ल.पा. प्रकल्प नव्याने तसेच एकुलती सा.त. प्रकल्प नव्याने उभारण्याचाही समावेश आहे. या टप्प्यातून १६,८६० हेक्टर क्षेत्राचे स्थिरीकरण होणार आहे.

            या प्रकल्पामुळे तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा मिळून शेती उत्पादनात लक्षणीय वाढ होणार आहे. प्रकल्पाच्या कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेऊन काम तातडीने सुरू करण्याच्या सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या.

            या आढावा बैठकीस सेवा निवृत्त अधीक्षक अभियंता श्री व्ही. डी. पाटील, अधीक्षक अभियंता श्री गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता श्री प्रल्हाद वराडे, उप अभियंता श्री चंद्रशेखर खंबायत आदी अधिकारी उपस्थित होते.

०००००००००००


Monday, 18 August 2025

जळगाव पंचायत समितीच्या विकासकामांचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा गावोगावी योजनांचा लाभ, कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण व्हावीत – पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪ घरकुल तक्रारींचे निवारण करून मार्ग काढणार

 








        जळगाव दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) – "गरिबांना हक्काची घरे वेळेत मिळणे ही आपली जबाबदारी असून अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समन्वय साधून विकासकामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करावीत," असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव पंचायत समितीत झालेल्या तक्रार निवारण आढावा बैठकीत केले.

            पालकमंत्री म्हणाले की, जल जीवन मिशनची कामे गतीमान व्हावीत. ग्रामपंचायत कार्यालये, शाळा खोल्या, अंगणवाड्या, स्मशानभूमी व पोहोच रस्ते या दैनंदिन गरजांशी निगडीत सुविधा वेळेत उभारल्या जाव्यात. ग्रामीण पाणंद रस्त्यांना आवश्यकतेनुसार VR दर्जा मिळवून द्यावा, यासाठी अभियंत्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावेत. जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या वाढवून शाळाबाह्य एकही विद्यार्थी राहू नये याची दक्षता घ्यावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV बसविण्याची प्रक्रिया सुरू असून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            बैठकीत घरकुल, गोठे बांधकाम, अतिक्रमण, शिक्षण, अंगणवाडी बांधकाम व ग्रामपंचायत विभागांतर्गत सुरू असलेल्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. आलेल्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

            मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले की, ग्रामपंचायतींनी घरकुलासह इतर तक्रारींचा निपटारा 8-10 दिवसांत करून योजना प्रभावीपणे राबवाव्यात. "ग्रामपंचायत ते पंचायत समिती हा महत्वाचा टप्पा असून येथे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तत्परतेने सेवा दिल्यास योजनांचा खरा लाभ नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचेल," असे त्या म्हणाल्या.

            यावेळी पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पालकमंत्री यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच बोलणार ग्रामपंचायत इमारतीच्या पूर्णत्वाचा दाखला सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभारी गटविकास अधिकारी सरला पाटील यांनी मानले. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रकल्प संचालक राजू लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भाऊसाहेब अकलाडे, कार्यकारी अभियंता सुनील पाटील, माजी महापौर विष्णू भंगाळे, माजी सदस्य पवन सोनवणे, माजी सभापती नंदलाल पाटील, जनार्दन आप्पा कोळी, हर्षल चौधरी, तालुका प्रमुख शिवराज पाटील, रमेश आप्पा पाटील, रवी कापडणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, सरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००००००००


नशिराबाद नगर परिषदेच्या नव्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण_ नशिराबाद आता विकासाच्या केंद्रस्थानी ; नव्या नगरपालिकेचे विकासात मोठे योगदान राहणार ! - पालकमंत्री गुलाबराव पाटील ▪ नशिराबाद मध्ये 14 कोटी रुपयाच्या कामाचे लोकार्पण, 8 कोटीच्या कामाचे भूमीपूजन

 









        जळगाव दि. 18 ( जिमाका वृत्तसेवा ) -  नशिराबाद गावाचे आता झपाट्याने शहरात रूपांतर होत आहे. विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग या दळणवळणाच्या सुविधेमुळे शहराचा मोठा विकास नजिकच्या काळात होईल. चार कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेली अत्यंत सुंदर नवी नगरपरिषद ही या शहराच्या विकासाचा मोठा आधार ठरेल असे सांगून आज शहरातील 14 कोटी रुपये कामाचे लोकर्पण आणि 8 कोटीच्या नव्या कामाचे भूमीपूजन झाले आहे. यामुळे शहराच्या पायाभूत सुविधा उत्तम होण्यासाठी मदत होणार  असून नशिराबाद करांच्या मागाणु नुसार  येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार असल्याचे  पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.  नशिराबाद नगरपरिषद नूतन इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

            पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, पिण्याचे पाण्यासाठी आणि रस्त्यावरील दिव्या साठी आता मंजूर केलेल्या 110 केव्हीच्या सोलार प्रकल्पातून 12 महिन्यातील 10 महिने शून्य आकार पडणार असल्यामुळे हा खूप मोठा खर्च नगर परिषदेचा वाचणार आहे. हा पैसा इतर विकासाच्या कामासाठी वापरला जाईल केवळ अठरा महिन्यात अत्यंत गुणवत्तापूर्ण नगर परिषद बांधली असून या इमारतीच्या वर एक मोठे सभागृह बांधण्यासाठी येणाऱ्या काळात निधी देऊ शहरासाठी भूमीगत गटारे, लागतील तिथे पुल दिले आहेत. त्यामुळे शहराच्या विकासाला गतीदेण्यासाठी सर्व गोष्टी पूरक आहेत. आता सर्वांनी शहराच्या प्रगतीसाठी काम करा. जिथे आवश्यकता आहे तिथे आपण असल्याचे सांगून 60.57 कोटी च्या भुयारी गटार योजनेला सुरुवात झालेली असून वाघुर नदीवरून फिल्टरसह शहराला पाणीपुरवठा योजनेचे काम देखील प्रगतीत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नशिराबादकरांना आश्वासीत केले.

             जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शहराला शोभेल अशी नगरपरिषद इमारत झाल्याचे सांगून नशिराबाद जळगाव आणि भुसावळ या दोन मोठ्या शहराच्या मध्यभागी असल्यामुळे विकासाचे नवे केंद्र बनेल. शहराच्या विकासासाठी लागणाऱ्या सर्व मूलभूत सुविधा उभारल्या जात असल्यामुळे आणखी विकासाला वेग येणार असल्याचे सांगितले.

            नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांनी आपल्या प्रास्ताविकात शहरात झालेल्या कामाची आणि होऊ घातलेल्या कामाची माहिती दिली. सूत्रसंचालन राजेंद्र पाचपांडे सर यांनी केले .

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे,

            माजी महापौर तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, जि.प. चे माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सरपंच विकास पाटील, शिवराज पाटील,  विकास धनगर, जि.प. चे माजी सदस्य पंकज महाजन, जि.प. चे माजी सदस्य पंकज महाजन, सा.बां .चे शाखा अभियंता श्री. रायसिंग़  चेअरमन योगेश पाटील, बापू बोढरे , किर्तीकांत चौबे , असलंम सर, रमेशअप्पा पाटील, किरण पाटील , कंत्राटदार नितीन बर्हाटे,  जितेंद्र महाजन , सुकलाल कोळी,  शालिक कोळी, शहरातील मान्यवर नागरिक यावेळी उपस्थित होते.

            यावेळी मंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीतील अनेक दालनांची पाहणी करून समाधान व्यक्त केले.

 लोकार्पण ठळक कामे

नवीन नगरपरिषद योजना अंतर्गत ४ कोटी रुपयांची नवीन फर्निचर सह प्रशासकीय इमारत बांधकामाचे लोकार्पण झाले. हायवेला लागून शहरातील मुख्य रस्त्यावर उभारलेल्या भव्य अशा प्रवेशद्वाराचे लोकार्पण देखील करण्यात आले. तसेच विशेष रस्ता अनुदान योजना 2023 - 24 अंतर्गत दत्त नगर, लक्ष्मी नगर, साई समर्थ नगर, नाज नगर, प्रभाग क्र. १ ते १० या भागांसह शहरातील अनेक वस्तीमध्ये रस्त्यांचे कॉक्रिटीकरण, पेव्हरब्लॉक बसविणे आणि गटारी बांधकामाची कामे एकूण ४३७.११ लक्ष रुपयांच्या खर्चाची कामांचे लोकार्पण करण्यात आले.

 भूमीपूजन ठळक  कामे

            नशिराबाद परिसरात एकूण ८१० लक्ष रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ होत आहे. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ३६० लक्ष रुपयांत महिला बचत गट सक्षमीकरणासाठी व्यापारी संकुल, नवीन प्रशासकीय इमारतीपासून नॅशनल हायवेपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण तसेच ११० केव्ही सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. तर विशिष्ट नागरी सेवा योजनेतून ४५० लक्ष रुपयांत दत्तनगर - मुक्तेश्वर नगर रस्ता काँक्रीटीकरण, पेठ - भवानीनगर जोडणारा पूल आणि लेवा पाटील समाजाकरिता सामाजिक सभागृह उभारले जाणार आहे. या कामांमुळे नशिराबादच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली  आहे.

0000000000000