जळगाव दि. १० (जिमाका वृत्तसेवा) – राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक बांधकाम उपक्रम वगळून), मंत्री श्री. शिवेंद्रराजे भोंसले रविवार, दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दौरा पुढील प्रमाणे.
दुपारी
०२.०० वाजता पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून VT-VRL या खाजगी विमानाने जळगावकडे प्रयाण
करून दुपारी ०३.१० वाजता जळगाव विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर मोटारीने छत्रपती शिवाजी
महाराज शिवसृष्टी, तोंडापूर, ता. जामनेर येथे प्रस्थान करतील. सायं. ०४.०० ते ०४.१०
या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व शिवसृष्टी लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित
राहतील. त्यानंतर ०४.१० ते ०४.४० पर्यंत तोंडापूर येथेच आयोजित जाहिर सभेला उपस्थित
राहतील.
सायं.
०४.४० वाजता तोंडापूर येथून फतेपूर, ता. जामनेर येथे प्रस्थान करून ०४.५५ ते ०५.००
वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक व शिवसृष्टी लोकार्पण सोहळा कार्यक्रमास हजेरी
लावतील. त्यानंतर ०५.०० ते ०५.४० वाजता फतेपूर येथेच आयोजित जाहिर सभा व सार्वजनिक
बांधकाम विभागाच्या हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत विविध कामांच्या लोकार्पण कार्यक्रमास
दूरदृश्यप्रणालीव्दारे उपस्थित राहतील.
यानंतर
०५.४० वाजता फतेपूर येथून 'नंदादीप' निवास, बजरंगपुरा, ता. जामनेर येथे जाऊन ०६.०५
ते ०६.३० वाजता जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांची सदिच्छा भेट घेतील. ०६.३० वाजता
'नंदादीप' येथून नवीन हेरिटेज शासकीय विश्रामगृह, जामनेर येथे प्रस्थान करून ०६.३५
ते ०६.५० वाजता इमारतीची पाहणी करतील.
यानंतर ०६.५० वाजता विश्रामगृहातून
जळगाव विमानतळाकडे प्रयाण करून ०७.२० वाजता विमानतळावर पोहोचतील आणि ०८.०० वाजता खाजगी
विमानाने छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment