काही पशुपालकांकडून गाठींचा आजार (Lumpy Skin Disease) झालेल्या गुरांची योग्य
काळजी घेतली जात नसल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. अशा दुर्लक्षामुळे संबंधित गुरांचा
मृत्यू होत असून, ही अत्यंत गंभीर बाब आहे. कायदेशीर जबाबदारी व शिक्षा
•प्राणी
क्रूरता प्रतिबंध अधिनियम, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act, 1960) च्या
कलम 3 नुसार, पशुपालकांनी आपल्या जनावरांची योग्य काळजी घेणे ही त्यांची कायदेशीर जबाबदारी
आहे.
•या
जबाबदारीकडे दुर्लक्ष केल्यास, कलम 11(1) अंतर्गत ही दंडनीय गुन्हा आहे.
प्राण्यांची जप्ती
•महाराष्ट्र
प्राणी संवर्धन अधिनियम, 1976 (The Maharashtra Animal Preservation Act, 1976) च्या
कलम 9 नुसार, ज्यांची योग्य काळजी घेतली जात नाही अशा जनावरांना विनाअनुदान जप्त केले
जाईल.
गंभीर दुर्लक्षामुळे
मृत्यू झाल्यास
•भारतीय
न्याय संहिता, 2023 (Bharatiya Nyaya Sanhita, 2023) च्या कलम 291 व 325 अंतर्गत, गाठींचा
आजार झालेल्या जनावरांची काळजी न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्यास एफ.आय.आर. नोंदविण्यात
येईल. यामध्ये कैदेची व दंडाची तरतूद आहे.
उपचाराचे पालन आवश्यक
•जिल्ह्यातील
सर्व पशुधन विकास अधिकारी बाधित जनावरांवर उपचार करत असून, ते पशुपालकांना लेखी औषधोपचाराची
पर्ची देतील.
•सर्व
पशुपालकांनी या सूचनांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.
सर्व पशुपालकांना आवाहन आहे की, आपल्या गुरांची वेळोवेळी
तपासणी करून, गाठींचा आजार झाल्यास त्वरित उपचार घ्यावेत. दुर्लक्ष आढळल्यास कायदेशीर
कारवाई करण्यात येईल.
जनावरांची काळजी ही केवळ मानवी जबाबदारीच नाही, तर कायद्याने
बंधनकारक कर्तव्य आहे.
०००००००००
No comments:
Post a Comment