Thursday, 8 July 2021

स्पर्धा परीक्षा तयारीबाबत ९ जुलै रोजी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

             जळगाव, (जिमाका) दि. ८ - राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, दि. ९ जुलै, २०२१ रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.

            या मार्गदर्शन सत्रात गट क व ड, रेल्वे, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स आदि स्पर्धा परीक्षा तयारीवर मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.

फेसबुक - https://www.facebook.com/MaharashtraSDEED

युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A

००००

No comments:

Post a Comment