जळगाव, (जिमाका) दि. 14 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार दि.15 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 7.30 वा. पाळधी ता. धरणगाव येथून अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगावाकडे प्रयाण. सकाळी 7.50 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे आगमन. सकाळी 7.50 ते 8.55 वाजेपर्यंत राखीव. सकाळी 8.55 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालय, जळगावकडे प्रयाण. सकाळी 9.03 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आगमन. सकाळी 9.05 वा. ध्वजारोहण व राष्ट्रगीत. सकाळी 9.07 ते 9.17 वाजेपर्यंत मा. मंत्री महोदयांचे शुभेच्छापर भाषण. सकाळी 9.17 ते 9.22 वाजेपर्यंत स्वातंत्र्य सैनिक व नागरीक यांना शुभेच्छा भेट. सकाळी 9.23 ते 9.37 वाजेपर्यंत चहापान. सकाळी 9.38 ते 10.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे V School कार्यक्रमाचे उदघाटन व इतर कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगावा (आवार) कडे प्रयाण तेथे ‘‘जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र’’ च्या नवीन इमारतीचे उदघाटन समारंभास उपस्थिती व मार्गदर्शन. सकाळी 10.45 वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथुन जिल्हा कृषी कार्यालय, जळगावकडे प्रयाण व तेथे ‘‘कृषीमाल निर्यात मार्गदर्शन केंद्र’’ चे उदघाटनास उपस्थिती व मार्गदर्शन. सकाळी 11.30 वा. जिल्हा कृषी कार्यालय, जळगाव येथुन अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण व राखीव. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी 4.15 वा. पाळधी ता. धरणगाव येथून भुसावळकडे प्रयाण. दुपारी 4.55 वा. भुसावळ येथे आगमन व तेथे ‘‘माजी सैनिकांचा सत्कार व देशभक्तीपर गीतगायक स्पर्धेस’’ उपस्थिती व मार्गदर्शन. सोईनुसार पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
00000
No comments:
Post a Comment