Friday, 5 March 2021

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

             जळगाव, (जिमाका) दिनांक 5 - राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.           

            शनिवार, दि. 6 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.15 वाजता कार्यकर्त्यांशी भेटी व चर्चा, सकाळी 8.45 वा. पाळधी, ता. धरणगाव येथून बांभोरी, ता. धरणगांवकडे शासकीय वाहन क्र. एमएच 19 सीयु 0399 ने प्रयाण. सकाळी 9.05 वा. बांभोरी प्र.चा, ता. धरणगाव येथे रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी  9.30 वा. खोटेनगर, ता. जळगाव येथे रस्त्याच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वा. धरणगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण व राखीव. सायंकाळी 4.15 वा. जळगाव तालुक्यातील विविध गावांतील नियोजित कार्यक्रमास उपस्थिती, सोईनुसार पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण व राखीव.

00000

No comments:

Post a Comment