जळगाव, दि. 24 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यातील उमेदवारांची नाव नोंदणी सन 2013 पासून विभागाच्या www.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर सुरू झालेली आहे. उमेदवार विभागाच्या संकेतस्थळावर जावून ऑनलाइन नाव नोंदणी करीत आहेत. उमेदवारांनी ऑनलाइन नाव नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डच्या अनुषंगाने विभागांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या सुविधांचा आणि माहितीचा उमेदवारांना लाभ घेता येतो, असे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि. जा. मुकणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.
अल्पसंख्यांक उमेदवाराना देखील रोजगार / स्वयंरोजगाराच्या संधी व सुविधाचा लाभ
मिळण्याकरीता जास्तीत जास्त अल्पसंख्यांक उमेदवारानी ऑनलाइन नाव नोंदणी करणे
अपेक्षित आहे. कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांना देखील नाव नोंदणी करण्याबाबत
मार्गदर्शन व साहाय्य कार्यालयाकडून करण्यात येते. या कार्यालयामार्फत रोजगाराच्या
संधी उपलब्ध करुन देण्यासाठी वेळोवेळी होणाऱ्या ऑनलाइन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा.
अल्पसंख्याक उमेदवारांनीही मेळाव्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. मुकणे यांनी
केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 9.45 ते
सायंकाळी 6.15 या कालावधीत दूरध्वनी क्रमांक 0257- 2959790 या क्रमांकावर संपर्क
साधावा.
00000
No comments:
Post a Comment