५२३ पदांसाठी १० जानेवारी
रोजी रोजगार मेळावा
सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव, दि.८ जानेवारी (जिमाका) – जिल्ह्यातील सुशिक्षित
बेरोजगारांसाठी विविध आस्थापनावरील ५२३ रिक्त पदांवर काम करण्याची संधी चालून आली
आहे. कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र वअरुणोदय ज्ञान प्रसारक
मंडळाचे महिला महाविद्यालयाच्या संयुक्त
विद्यमाने विभागाच्या वतीने १० जानेवारी रोजी खाँजामीया रस्त्यावरील एस.एन.डी.टी
महिला महाविदयालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात
तरूणांनी सहभागी व्हावे. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता विभागाचे
सहायक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.
याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.४५ ते संध्या
६.१५ या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२५७ - २९५९७९० वर संपर्क
साधावा. असे आवाहन ही श्री.रिसे यांनी
प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
००००००००००००००००००००००
No comments:
Post a Comment