Tuesday, 1 October 2024

अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके प्रात्यक्षिक

              जळगाव दि. १ ( जिमाका ) -   अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींच नियोजन करण्यात आलेले आहे. या करिता चालू वर्षी हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमुग, व मोहरी या पिकांचे          महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके हि बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत.

                  पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या  बियाण्याचा २ हेक्टर मर्यादेत लाभ देय असणार आहे.

                  या निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जात ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर २८ सप्टेंबर, २०२४ ते ६ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत बियाणे, औषधे व खते या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील, तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाऊ ऑनलाईन अर्ज करावेत,  व या योजनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

000000000

No comments:

Post a Comment