Friday, 29 August 2025

भटके विमुक्त समाज सन्मानार्थ सन्मान दिवस म्हणून 31 ऑगस्ट रोजी आयोजन

             जळगाव, दि. २९ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) सन 1871 साली ब्रिटिश सरकारने Criminal Tribes Act अंतर्गत काही जातींना गुन्हेगार जाती म्हणून घोषित केले. यामुळे या  जातीमधील समाजबांधवांना स्वातंत्र्यपूर्व काळात अमानुष अत्याचार सहन करावा लागला. स्वातंत्र्यानंतरही हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिल्याने भटक्या व विमुक्त समाजाला न्यायासाठी विलंब झाला, पर्यायाने याचे दिर्घकालीन सामाजिक परिणाम या समाजावर झाले.  स्वातंत्र्यानंतर 31 ऑगस्ट 1952 रोजी Criminal Tribes Act हा कायदा रद्द करण्यात आला आणि या जातींना  विमुक्त जाती   ( म्हणजे मुक्त झालेल्या) म्हणून घोषित करण्यात आले.

            भटके विमुक्त समाज महाराष्ट्र राज्याच्या व देशाच्या प्रगतीमध्ये आपले योगदान देत आहेत. भटके विमुक्त समाजाचे स्वातंत्र्यातील व राष्ट्रउभारणातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्या सन्मानार्थ 31 ऑगस्ट दिवस भटके विमुक्त दिवस  साजरा करण्यात येणार आहे.

            दिनांक ३१ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता के. सी.ई. इंजिनिअरिंग कॉलेज,  नॅशनल हायवे 6 आय एम आर कॉलेज जवळ जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमांस नागरीकांना उपस्थित राहावे,  असे आवाहन सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जळगांव  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

Thursday, 28 August 2025

ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणात थकित व्याजावर ५० टक्के सवलत

         जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) –"ओबीसी महामंडळाच्या थकित कर्ज प्रकरणांत संपूर्ण कर्ज रक्कमेच्या एकरकमी भरण करणा-या लाभार्थिस थकित व्याज रक्कमेत ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा (ots) रावाविण्यात येत आहे. त्यानुसार, महामंडळाच्या थकबाकीदार  लाभार्थीनी सदर योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे"

            महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. मुल यांचे जिल्हा कार्यालय जळगांव यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतर्गत जळगाव जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना कर्ज परतफेडीसाठी विहित मुदत देण्यात येते.  विहित मुदत संपूर्ण गेली असताना थकित कर्ज वसुलीसाठी सर्व वैधानिक प्रयत्न महामंडळाकडुन करण्यात येत आहेत.

            याकरीता, महामंडळाच्या थकित लाभार्थीसाठी संपुण थकित कर्ज रक्मेच्या एकरकमी भरणा करणा-या लाभार्थीस थकित व्याज रकमेत ५० टक्के सवलत देण्याची सुधारीत एकरकमी परतावा (ots) योजना नव्याने राबविण्यात येत आहे. या योजनेत (एक रककमी परतावा - ots) लाभ घेऊन सर्व संबधित लाभार्थीनी थकित मुददल व्याज रक्कम एकरकमी भरणा करून कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व भविष्यात होणारी संभावित कायदेशिर कार्यवाही टाळावी, असे आवाहन मा. जिल्ह व्यवस्थापक, जळगांव यांनी केले आहे.

            अधिक माहिती साठी कार्यालयाचा पत्ता :- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महाबळ कॉलनी, पहिला मजला, महाबळ रोड, सैनिक हॉल च्या पाठीमागे, जि. जळगांव फोन नं. ०२५७-२२६१९१८

00000000000

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांक ने सादर करण्यासाठी अर्ज (परीशीष्टे-१) उपलब्ध बाबत (सन २०२५-२६) (जाहीर सूचना)

पाणी वापर संस्थांना आवाहन

            महात्मा फुले पाणी वापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा सन सन २०२५/२६ करीता अभियाना बाबत ई-प्रशासन मंडळ, पुणे मार्फत नामांकने सादर करण्यासाठी ऑनलाइन नामांकन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी सर्व कार्यान्वित पाणी वापर संस्था यांनी या पुरस्कार स्पर्धेत सक्रीय सहभाग घ्यावा.

            सदर स्पर्धा राज्यस्तरावर घेण्यात येणार असुन या स्पर्धेसाठी अ) मोठे / मध्यम प्रकल्प आणि ब) लघु प्रकल्प / कोल्हापूर पध्दतीचे बंधारे / साठवण तलाव / कालवा / नदीवरील वैयक्तीक अथवा सहकारी उपसा अशा दोन गटांमध्ये राज्यस्तरीय स्तरावर प्रथम व व्दितीय असे ४ पुरस्कार, तसेच प्रत्यके महामंडळाची भौगोलिक परीस्थती व सिंचन व्यवस्था वेगळी असल्याने पाच महामंडळ स्तरावर वरील दोन गटांमध्ये प्रथम व व्दितीय याप्रमाणे २० पुरस्कार असे एकत्रित २४ पुरस्कार प्रदान करण्यात येतील, यावरील कार्यान्वित असलेल्या पाणी वापर संस्थाकडुन नामांकने मागविण्यात येत आहेत. या स्पर्धेसाठी इच्छुक पाणी वापर संस्थानी सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता यांचेकडे दिनांक ०१ सप्टेंबर २०२५ च्या आत नामांकने (प्रस्ताव) दाखल करावीत.

            सदर योजनेअंतर्गत सुधारणा करून राज्यस्तरीय दोन्ही गटामध्ये प्रथम व व्दितीय, प्रथम क्र.-रू ५ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू ३ लक्ष व प्रशस्ती पत्र असे एकुण चार पुरस्कार एकुण रक्कम-१६ लक्ष महामंडळ स्तरावर दोन्ही गटामध्ये महामंडळ स्तरावर पुरस्कार प्रत्येकी प्रथम क्र.रू-२ लक्ष व प्रशस्ती पत्र व व्दितीय क्र. रू १ लक्ष व प्रशस्ती पत्र तसेच सिंचन व्यवस्थापन व पाणी वापर संस्था सक्षमीकरणाचे उत्कृष्ट काम करणारे उपअभियंता व त्यांच्या खालिल दर्जाचे अधिकारी व सिंचन कर्मचारी यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील, पुरस्कार वितरण समारंभ दर वर्षी सिंचन दिनी २६ फेब्रुवारी रोजी वितरीत करण्यात येतील स्पर्धा ५ वर्षा साठी राहील.

            तसेच सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पाणी वापर संस्था यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन              मा. कार्यकारी संचालक, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अध्यक्ष (खान्देश प्रदेश) यांनी केले आहे. सदर नामांकनासाठीचे (प्रस्तावासाठीचे) विहीत नमुन्यातील प्रपत्र सिंचन व्यवस्थापनाशी संबंधित कार्यकारी अभियंता/उपविभागीय अभियंता यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. असे कार्यकारी अभियंता                 (अ.गि. कुलकर्णी) जळगांव पाटबंधारे विभाग, जळगांव तथा सदस्य सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार स्पर्धा खान्देश प्रदेश स्तरीय समिती  यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000000000

इस्राईल देशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी

                 जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – इस्राईल देशामध्ये होम बेस्ड हेल्थ केअर गिव्हर वर्कर्स (Home Based Health Care Giver Workers) या पदासाठी ५००० नोंकरीची संधी उपलब्ध झालेली असून, या पदासाठी पात्रतेचे निकष व जाहिरातीचा तपशील https://maharashtrainternational.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यामध्ये साधारणतः किमान १० उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणाऱ्या वय वर्षे २५ ते ४५ वयोगटाचे उमेदवार या रोजगाराच्या संधीसाठी पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजी वाहु (घरगुती सहायक) सेवांसाठी निपुण/पारंगत, भारतातील सक्षम नियामक प्राधिकरणा द्वारे मान्यता प्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पुर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय सक्षम नियामक प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवायफरी मधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंट मधील प्रशिक्षण पुर्ण असणे उपलब्ध, तसेच GDA/ANM/GNM/BSC Nursing/Post BSc Nursing अशाप्रकारची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. अधिक माहिती तसेच नमुद पदासाठी अर्ज करणेसाठी वरिल संकेतस्थळास भेट देणे आवश्यक आहे.

            तरी या संधीचा लाभ जळगाव जिल्हयातील अधिका- अधिक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०२५७ - २९५९७९० यावर किंवा कार्यालयाचा पत्ता -  शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. असे आवाहन  सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जळगाव.यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

0000000000

जिल्हाधिकारी कार्यालयात १ सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

             जळगाव, दि. २८ ऑगस्ट, (जिमाका वृत्तसेवा) – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अल्पबचत सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री माळी यांनी दिली आहे.

            या दिवशी विविध विषयांवरील तक्रारींबाबत तक्रारदार प्रत्यक्ष अर्जासह उपस्थित राहणार असून, संबंधित विभागप्रमुखांची उपस्थिती अनिवार्य आहे.

            नागरिकांनी आपल्या तक्रारी व समस्या घेऊन लोकशाही दिनी उपस्थित राहावे, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                          000000000000

Tuesday, 26 August 2025

पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५

             जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  पुनर्रचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना (आंबिया बहार) सन २०२४-२५ अंतर्गत जळगाव जिल्हयात ७२,५६९ शेतक-यांनी या योजनेत भाग घेवुन ७६,२४२.८५ हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले असुन शेतकरी हिस्सा पोटी रुपये ६४.५५ कोटी रक्कम भारतीय कृषि विमा कंपनीकडे वर्ग करण्यात आलेले आहे.

         सदर योजनेत कमी तापमान व जादा तापमान या घटकातंर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार शेतक-यांना विमा कंपनीमार्फत नुकसान भरपाई अदा करण्यात येते. सदर नुकसान भरपाई ठरविण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून प्राप्त अहवाल व निकषांव्दारे शेतक-यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत अदा करण्यात येत असते. सदर नुकसान भरपाई अदा करण्यासाठी जळगाव जिल्हयासाठी नियुक्त केलेल्या भारतीय कृषि विमा कंपनीला स्कायमेट कंपनीकडून हवामान घटकांची माहे नोव्हेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ मधील कमी तापमानाची आकडेवारी, माहे एप्रिल, मे २०२५ मधील जादा तापमानाची आकडेवारी ची माहिती अधिकृत/प्रमाणित आकडेवारी अद्यापपावेतो केंद्र शासनाच्या पोर्टलवर प्राप्त झालेली नाही.

                शेतक-यांना नुकसान भरपाई देय होण्यासाठी स्कायमेट कंपनीकडून हवमान धोके घटकांतर्गत नुकसानी संदर्भात प्राप्त होणारी प्रमाणित केलेली माहिती व आकडेवारी ग्राहय धरली जात असल्याचे कृषि विभागाकडुन प्रसिध्द करण्यात येत आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

000000000000

केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे जनरेट करणे बाबत

        जळगाव, दि. 26 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):-  विशेष सहाय्य योजने अंतर्गत केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृध्दापकाळ, विधवा, दिव्यांग लाभार्थ्यांचे (DLC) हयाती बाबतचे प्रमाणपत्र सत्यापन ॲपस व्दारे ऑनलाईन जनरेट करणे कामी भुसावळ शहर येथील लाभार्थी यांनी तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत आधार कार्ड, बॅकेचे पासबुक, मोबाईल घेऊन कार्यालयामध्ये इत्यादी कागदपत्रे सादर करावे, असे  नायब तहसीलदार, संजय गांधी योजना शहर  भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले  केले आहे.

०००००००००००