जळगाव जिमाका वृत्त सेवा) दि. -१०- केंद्र सरकारच्या कामगार आणी रोजगार विभागाच्या पोर्टलवर देशातील असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या ई-श्रम पोर्टलवर मासेमारी करणारे, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषंगिक कामांशी प्रत्यक्ष जुळले असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श.र. कुदळे यांनी केले आहे
मत्स्यव्यवसाय
क्षेत्राशी निगडीत कामगारांना http://register.eshram.gov.in/#/user/self या
पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. सदर पोर्टलमध्ये संबंधित व्यक्तींना प्रधानमंत्री
सुरक्षा विमा योजनेतर्गत अपघाती मृत्यूनंतर दोन लाख व कायमस्वरूपी दिव्यांगत्व
आल्यास १ लाख रूपये मदत देणे शक्य होईल, अचानक उदभवणा-या व राष्ट्रीय
महामारीसारख्या परिस्थितीत मदत वितरित करताना ही माहिती कामी येणार आहे.
सदर
पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी संबंधीत व्यक्तीची वयोमर्यादा १६ ते ५९ वर्षे आहे. या व्यक्ती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे सभासद नसावेत, कोणत्याही शासकीय वा निमशासकीय
सेवेत नसावे, जिल्हयातील मत्स्यकास्तकार स्वतः या पोर्टलवर नोंदणी करू शकतात अथवा
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र येथे नोंदणी करू शकतात. यासंदर्भात अधिक
माहितीसाठी (प्र) सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जळगांव कार्यालयाशी कार्यालयीन
वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन एका प्रसिध्दी पत्रकान्वये करण्यात आले आहे. 0000
No comments:
Post a Comment