जळगाव, दि. 3 (जिमाका वृत्तसेवा):- महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या क्रीडा महर्षींचा गौरव करण्यासाठी राज्य शासनामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 30 जानेवारी, 2023 पर्यंत मुदत होती. तथापि, या कालावधीत असलेल्या खेलो इंडिया व इतर स्पर्धाच्या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण शिबीर व स्पर्धांमुळे अर्ज करण्यास पुरेसा कालावधी न मिळाल्याने या पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास 20 फेब्रुवारी, 2023 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत ऑफलाईन पद्धतीने सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे.
साहसी
क्रीडा पुरस्कारासह सर्व क्रीडा पुरस्कारासाठी कामगिरीचा कालावधी त्या पुरस्कार
वर्षातील 30 जून रोजी संपण्याऱ्या वर्षासह विचारात घेण्यात येईल. पुरस्कारासाठी
अर्जाचे नमुने, शासन निर्णय यासाठी क्रीडा विभागाच्या
https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील ताज्या बातम्यामधील लिंकवर
पहावे. पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याऱ्या इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,
दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा
अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment