Wednesday, 8 February 2023

राज्यस्तरीय शुटींगबॉल क्रीडा स्पर्धेचे उदघाटन संपन्न

        जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय शालेय शुर्टीगबॉल क्रोडा स्पर्धेचे आयोजन 7 ते 9 फेब्रुवारी, 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपअधीक्षक श्री. रायसिंग, राज्य शुर्टीगबॉलचे अध्यक्ष सुनिल पाटील, राज्य शुर्टीगबॉलचे के. आर. ठाकरे, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी अशोक चौधरी, राज्य शुर्टीगबॉलचे सहसचिव अंकुश राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिद दिक्षित आदिंच्या उपस्थितीत मैदानाचे पुजन करुन संपन्न झाले.

            सदर स्पर्धेकरीता राज्यातील आठ विभागातून 17 व 19 वर्षाआतील मुला, मुलींचे संघ उपस्थित होते. या स्पर्धेमधून 19 वर्षे मुलांच्या गटात नागपुर, नाशिक, लातूर व अमरावती या विभागातील खेळाडंहूनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर 19 वर्ष मुलांच्या गटात नागपूर, नाशिक, लातुर व उमरावती या विभागातील खेळाडुंना उत्कृष्ठ खेळाचे प्रदर्शन केले. तसेच 17 वर्षे मुलींच्या गटात अमरावती, नाशिक व पुणे या विभागातील खेळाडुंनी तर 17 वर्ष मुलीच्या गटात कोल्हापूर, लातुर व पुणे विभागातील खेळाडुंनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही गटातील सामने चुरसीचे सुरु असून प्रत्येक विभाग चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. दिक्षित यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

            राज्यस्तर स्पर्धेकरीता पंच म्हणून श्री अशोक तायडे, श्री. नईम शेख, श्री. रामलाल पवार, श्री. मोहसीन शेख, श्री. महेंद्र गावडे, श्री सुनिल होडेकर आदी काम पाहत आहे.

00000

No comments:

Post a Comment