जळगाव, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) :- मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा न्यायालय जळगाव यांचेकडील फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 616 / 2020 या दाव्यामध्ये गैरअर्जदार गजानन दौलत जगताप रा. मांडवे खु. यांचेकडून खावटीची रक्कम रुपये 4,56,000/- मात्र यसुल करणेबाबत आदेश पारीत करण्यात आलेले आहे. परंतु गैरअर्जदार श्री. गजानन दौलत जगताप यांनी सदर खावटीची रक्कम मा. मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांचेकडेस अदा केलेली नसल्यामुळे त्यांचेकडील खावटीची रक्कम वसूल करणेकामी त्यांची मौजे मांडवे खु. ता. जामनेर येथील शेतजमीन गट क्र.78/01 खाते क्र. 614 वरील महाराष्ट्र शासन या क्षेत्रातील जागेचे क्षेत्र है.0.45.25 आर आकार 1,40, पो.ख. 0.11.25 पुरते या जप्त केलेल्या शेतजमीनीचे दि. 26 एप्रिल,2022 रोजी सकाळी 11.00 वाजता तहसिल कार्यालय जामनेर येथे जाहीर लिलाव करण्यात आलेला होता.
परंतु
मा.मुख्य न्यायदंडाधिकारी जळगाव यांचेकडील पत्र दि. 12 मे, 2022 अन्वये वसुलीचे
आदेश तात्पुरते स्थगित ठेवणेबाबत सूचित करण्यात आलेले असल्यामुळे सदर वसुली तात्पुरती
स्थगित ठेवण्यात आलेली होती. तरी मा. जिल्हा न्यायदंडाधिकारी यांचेकडील पत्र दि. 8
डिसेंबर, 2022 नुसार सदरची थकबाकी वसुलीची कार्यवाही करणेबाबत आदेशित करण्यात
आलेले आहे. त्यानुसार गैरअर्जदार गजानन दौलत जगताप रा. मांडवे यांची मौजे मांडवे
खु.ता.जामनेर येथील शेतजमीन गट क्र.78/01 खाते क्र.614 वरील महाराष्ट्र शासन या क्षेत्रातील
जागेचे क्षेत्र हे. 0.45.25 आर आकार 1.40, पो.ख.0.01.25 पुरते या जप्त केलेल्या
शेतजमीन मिळकतीचा जाहिर फेरलिलाव दि.9 मार्च, 2023 रोजी सकाळी 11.100 वाजता तहसिल
कार्यालय जामनेर येथे ठेवण्यात आलेला आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती किंवा
संस्थांनी लिलावात भाग घ्याया लिलावातील अटी व शती लिलावातील शेतजमीन, लिलावातील
बोलीहातची किंमत इत्यादी बाबत कार्यालयीन वेळेत तहसिलदार जामनेर अरुण शेवाळे यांचेशी संपर्क साधावा.असे एका
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment