Thursday, 2 March 2023

जळगावात 4 मार्च रोजी युवा उत्सवाचे आयोजन

             जळगाव, दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) - स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना व मुल्ये पुन्हा जागृत करणे, राष्ट्रभक्ती, समता, बंधुत्वाची भावना वृध्दीगंत करणे आणि तरुण युवा कलावंतांना व्यासपीठ निर्माण करुन देण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र, जळगाव व जिल्हा प्रशासन, जळगाव व्दारा जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन केले आहे. यामधे सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण 4 मार्च, 2023 रोजी राजे छत्रपती संभाजी महाराज नाट्यसंकुल, जळगाव येथे जिल्ह्यामधील सर्व युवकांना निःशुल्क सहभाग घेता येणार आहे. असे नरेंद्र डागर, जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे

            अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, गट नं. 40, प्लॉट नं. 60, द्रौपदी नगर, जळगाव, फोन नं. 0257-2951754 ईमेल : qnykjalgaon@gmail.com वर कार्यालयास संपर्क साधावा.

            जिल्हातील तरुण युवा कलावंतांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेत, असे आवाहन       श्री. डागर यांनी केले आहे.                                         

00000

No comments:

Post a Comment