जळगाव, दि. 25 (जिमाका वृत्त) - सहकार विभागांतर्गत जीडीसी अँड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र परिक्षा शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालय, जिल्हापेठ, स्टेट बैंक ऑफ इंडिया मुख्य शाखेजवळ, जळगाव या केंद्रावर 26 ते 28 मे, 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
ज्या
परिक्षार्थीनी या परिक्षेसाठी अर्ज केले आहेत, अशा परिक्षार्थीनी आपले परीक्षा
प्रवेशपत्र gdca.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून आपण तयार केलेल्या लॉगिन
आयडीवरून उपलब्ध करून घ्यावे. याबाबत परीक्षार्थीना काही अडचण असल्यास जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव कार्यालयाशी संपर्क करावा. असे आवाहन संतोष बिडवई,
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment