Monday, 8 May 2023

दस्त नोंदणी कार्यालय जळगाव क्रं-3 प्रत्येक शनिवार व रविवार सुरू राहणार

        जळगाव, दिनांक ८:-  (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे महसूल मंत्री  राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागरीकांच्या सोयीसाठी प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टयांच्या दिवशी महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवणेबाबतचा निर्णय घेतलेला असून  त्यानुसार जळगाव शहरातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 जळगाव क्र.3 हे एक  दस्त नोंदणी कार्यालय   यापुढे  नागरीकांच्या सोयीसाठी शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ढेवावे अशा सुचना  नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्देशित केलेले आहे.

उपरोक्त निर्देशानुसार नागरीकांच्या सोयीसाठी जळगाव महानगरपालिका क्षेत्रातील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 क्र.2 हे कार्यालय दिनांक 06 मे 2023 पासून प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सुरू ठेवण्यात आले आहे. तसेच सदर कार्यालयास प्रत्येक सोमवार व  मंगळवार या दिवशी पर्यायी सुट्टी देण्यात आली असून सोमवार व मंगळव या दोन्ही दिवशी जळगाव क्रमांक -3 हे दस्त नोंदणीचे कार्यालय बंद राहील.

तरी प्रत्येक शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीचे दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग 2 जळगाव क्र.3 हे कार्यालय दस्त नोंदणीसाठी सुरू ठेवण्यात आले असल्याने जास्तीत जास्त नागरीकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी.जळगाव सुनिल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये  केले नाहे.

00000


 

No comments:

Post a Comment