जळगाव, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले.
यावेळी
निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, तहसिलदार (सामान्य शाखा) सुरेश थोरात, अव्वल
कारकून गणेश साळी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment