जळगाव, दि. 18 (जिमाका )- जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
समस्याग्रस्त व पीडित महिलांना
प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना
न्याय मिळावा, समाजातील पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी,
म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर
प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.
या लोकशाही दिनी ज्या महिलांना
अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई-
मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या
लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल आयडी
खालीलप्रमाणे - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव- dwcwjal@gmail.com,
तहसीलदार जळगाव - tahasildarjalgaon@gmail.com, तहसीलदार जामनेर-
tah.jamner@gmail.com, तहसीलदार एरंडोल- erandoltahsil123@gmail.com, तहसीलदार
भुसावळ- tahsilbhusawal@gmail.com, तहसीलदार धरणगाव- dharangaon2014@gmail.com,
तहसीलदार बोदवड- tahsilbodwad@gmail.com तहसीलदार यावल- tyawal@gmail.com,
तहसीलदार रावेर- tahsilraver@gmail.com, तहसीलदार भडगाव-
tahsildarbhadgaon@gmail.com, तहसीलदार चाळीसगाव- tahsildar40gaon@gmail.com,
तहसीलदार अमळनेर- amalnertahsil@gmail.com, तहसीलदार पारोळा-
parolatahsil@gmail.com, तहसीलदार पाचोरा-
tahsilpachora@gmail.com, तहसीलदार मुक्ताईनगर- tahsilmkt@gmail.com,
तहसीलदार चोपडा- tahsildarchopda@gmail.com
तरी संबंधित तालुक्यातील महिलांनी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांचे ई-
मेलवर अर्ज पाठवावे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment