जळगांव, दि.१० ऑगस्ट (जिमाका)- सहकार विभागातील क संवर्गातील सरळसेवेची रिक्त पदांसाठी १४ व १६ ऑगस्ट रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेचे प्रवेशपत्र https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील लिंकवरून डाऊनलोड करून घ्यावेत. असे आवाहन जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) संतोष बिडवई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रवेशपत्राबाबत सूचना अर्ज सादर करतेवेळी
नोंदणीकृत केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई - मेल आयडी यावर पाठविण्यात आल्या
आहेत. प्रवेशपत्र डाऊनलोड करावयाची लिंक बाबतच्या सूचना सहकार आयुक्ताच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या
अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्दी करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना या
संकेतस्थळावरुन परिक्षेचे प्रवेशपत्र प्राप्त करावे आणि परीक्षेस येतांना त्यांची
रंगीत प्रत सोबत ठेवावी. प्रवेशपत्रात नमूद सूचनांचे उमेदवारांनी तंतोतंत पालन
करावे. असे आवाहन ही श्री.बिडवई यांनी केले आहे.
०००००००००००००००००००००
No comments:
Post a Comment