जळगाव, दि. १८ ऑगस्ट (जिमाका) - जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी (DDO) अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी. असे आवाहन जिल्हा सांख्यिकी उपसंचालक रा. पु. बोरसे प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
अधिनस्त असलेल्या अधिकारी व
कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास विलंब टाळण्यासाठी सर्व आहरण व संवितरण
अधिकाऱ्यांनी विहीत वेळेत प्रथम प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत व सर्व शासकीय
कर्मचाऱ्यांनी आपला अचूक माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी संगणकीय आज्ञावलीत
भरल्याची खात्री करून घ्यावी. अधिक माहितीसाठी समीर भालेराव, (सहायक संशोधन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी
कार्यालय जळगाव) यांचेशी (०२५७)-२९९७०५७ या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहनही
उपसंचालक जिल्हा सांख्यिकी कार्यालया मार्फत करण्यात आले आहे.
०००००
No comments:
Post a Comment