जळगाव दि. 29 ( जिमाका ) राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर ' महासंस्कृती महोत्सव ' आयोजित करण्यात आला आहे. त्यात स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्यात आले आहे. त्याबरोबर राज्यातील विविध कला सादर करणारे कलाकार यांनाही आमंत्रित केले आहे. संध्याकाळी 5 पासून रात्री 9.30 पर्यंत कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी या सांस्कृतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील,
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
या महासंस्कृती महोत्सवात शुक्रवारी दि. 1 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5.30 ते 7 पर्यंत गण गवळण, बतावणी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शाहिरी, सायंकाळी 7.30 ते 9.30 पर्यंत 'सुरसंस्कृती' हा कार्यक्रम होणार असून त्यात सौ. सन्मिता धापटे-शिंदे (सूर नवा ध्यास नवाची विजेती महागायिका) चैतन्य कुलकर्णी (सा, रे, ग, म, प, फेम) यांचा सहभाग असणार आहे. तर 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 ते 7 पर्यंत बहिणाबाईच्या कविता, गीत गायन होईल. तर संध्याकाळी 7.30 ते रात्री 9.30 पर्यंत गर्जा सुवर्णमहाराष्ट्र हा महाराष्ट्राची संस्कृती दाखवणारा स्वरनिनाद कल्चरल फाऊंडेशनकृत हा सुप्रसिद्ध कार्यक्रम होणार आहे. तर 3 मार्च रोजी सायंकाळी 5.50 ते 7 पर्यंत अवधेय... एक आदर्श ही
नृत्य नाटिका होणार असून संध्याकाळी 7.30 ते रात्री 9.30 पर्यंत 'रायगडाला जेव्हा जाग येते तेंव्हा' हे साहित्य संघ, मुंबई निर्मित व उपेंद्र दाते दिग्दर्शित नाटक बघायला मिळणार आहे. ही सांस्कृतिक मेजवानी जळगावकरांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या मेजवानीची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी नक्की या असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही करण्यात येत आहे. याच मैदानावर जिल्ह्यातील महिलांच्या बचत गटाचे 'मुक्ताई सरस प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. त्या प्रदर्शनात महिला बचत गटाकडून तयार केलेल्या वस्तू, खाद्य पदार्थही इथे उपलब्ध आहेत.
एस. टी. महामंडळाकडून तालुक्यातील जनतेसाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत जळगाव बसस्थानकावरून बस उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने करून दिल्या आहेत.
000000000
No comments:
Post a Comment