जळगाव, दि. 20 (जिमाका ) आद्य मराठी पत्रकार ‘दपर्ण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी सोपान कासार यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तहसिलदार (महसूल) गुजांळ मॅडम, तहसिलदार विजय बनसोडे सर्वसाधारण , यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
000000000
No comments:
Post a Comment