जळगाव,
दि. 30 - राज्याचे
सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील हे गुरुवार दि.31 ऑगस्ट, 2017 रोजी जिल्हा
दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-
गुरुवार
दि. 31 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत पाळधी ता. धरणगाव येथे राखीव, सकाळी
दहा वा. जामनेरकडे प्रयाण. सकाळी अकरा वा. जामनेर येथे तापी खोरे राज्य एकात्मिक
जलआराखडा अंतर्गत तापी उप खोऱ्याच्या (दक्षिण) बृहत आराखडा तयार करणे संदर्भात
कार्यशाळेस उपस्थिती. (स्थळ :- शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती, जामनेर,
जि. जळगाव), दुपारी एक वा. पाळधी ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव. दुपारी चार ते
सायं सात वाजेपर्यंत धरणगाव तालुक्यातील विविध गावांना भेटी. सायं सात वा. पाळधी
ता. धरणगावकडे प्रयाण व राखीव.
०००००
No comments:
Post a Comment