Wednesday, 30 August 2017

शेतकऱ्यांचे ऑनलाईन फॉर्म भरुन घेण्यासाठी तालुकानिहाय समन्वयकांची नेमणूक


        जळगाव, दि. 30 - राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहिर केली  आहे. या योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन घेण्यासाठी तालुकानिहाय समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती  जिल्हा उपनिंबधक, सहकारी संस्था विशाल जाधवर यांनी दिली आहे.
            या योजनेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी  महा ई सेवा केंद्र, सी.एस.सी , आपले सरकार पोर्टल सुरु करण्यात आले आहे. कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज भरण्यास येताना सोबत कर्ज खाते पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स (असल्यास), पेंन्शन धारक असल्यास पी.पी.ओ. बुकची झेरॉक्स आणणे आवश्यक आहे.   शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र, सी.एस.सी व ए.ए.एस.के. केंद्रांबाबत श्री. स्वप्नील पाटील - 7400423299, श्री. किशोर धोते - 8605533057 व तालुक्याचे सहाय्यक निबंधक, यांच्याशी  संपर्क साधावा.            
            आपले सरकार ई-सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असुन संपर्कासाठी https://csmssy.in/farmer/#// या Link वर माहिती उपलब्ध आहे.  तसेच अधिक संपर्कासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेशी तसेच विविध कार्यकारी सेवा सरकारी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. जाधवर यांनी केले आहे.
            कर्जमाफी योजनेचे ऑनलाईन अर्ज भरणे व अधिक माहितीसाठी समन्वय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे- श्री मुकेश बारहाते, उपनिबंधक, जळगाव - 7588154362, श्री. आर. आर. पाटील, सहाय्यक निबंधक, भुसावळ  -8275008282, श्री. एम. आर. शहा,  सहाय्यक निबंधक, जामनेर- 9403738620, श्री. एम. एच. लाठी,  सहाय्यक निबंधक, चोपडा-9423772977, श्री. एस. एफ. गायकवाड, सहाय्यक निबंधक, रावेर-8483971797, श्री. तुषार लाटणे, सहाय्यक निबंधक, यावल-9969133581, श्री. आर. एम. जोगदंड, सहाय्यक निबंधक, बोदवड-9881519282,श्री. ए. डी. बागल, सहाय्यक निबंधक, मुक्ताईनगर - 8888958099, श्री. के. पी. पाटील, सहाय्यक निबंधक, एरंडोल -9975933009, श्री. जी. एच. पाटील, सहाय्यक निबंधक, धरणगाव -9422784797, श्री. पी. एस. पाटोळे, सहाय्यक निबंधक, भडगाव -9421605625, श्री. पी. एस. पाटोळे, सहाय्यक निबंधक, पाचोरा - 9421605625, श्री. जी. एच. पाटील, सहाय्यक निबंधक, अंमळनेर-9422784797,श्री. ए. ए. गावडे, सहाय्यक निबंधक, पारोळा -9921837407, श्री. ए. डी. जगताप, सहाय्यक निबंधक, चाळीसगाव -8007424101 यांचेशी संपर्क साधवा. ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा विनामुल्य आहे.
            अधिक माहितीसाठी श्री. सुनिल दामले, प्रबंधक, जिल्हा अग्रणी बँक, जळगाव - 7507766002, श्री. जितेंद्र देशमुख, कार्यकारी संचालक, जि. म. स. बँक लि. जळगाव- 9552320049 व श्री. विशाल जाधवर जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव- 0257/2239729 यांचेशी संपर्क करावा. असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००

No comments:

Post a Comment