जळगाव, दि. 30- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड येथे अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात तासिका तत्वावर
निदेशकांची नेमणूक करण्यात येणार असल्याची
माहिती प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोदवड यांनी दिली आहे.
या
प्रशिक्षण संस्थेत सुतारकाम, यांत्रिक मोटारगाडी, विजतंत्री आणि एनटप्रिनरशिप ॲण्ड
कम्युनिकेशन स्किल या पदांसाठी नेमणूक करावयाची आहे. इच्छुकांनी प्राचार्य, औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, बोदवड यांचेकडे 10 दिवसाचे आत आपले अर्ज शैक्षणिक, अनुभवाचे
प्रमाणपत्र व वैयक्तीक ईमे, फोन नंबर, ओळखपत्राच्या प्रतींसह पाठवावेत. तसेच
दूरध्वनी क्रमांक- 02582-275700, ईमेल आयडी iti.bodwad@dvet.gov.in, iti_bwd@yahoo.com. येथे संपर्क करण्याचे प्राचार्यांनी
एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment