जळगांव, (जिमाका) दि. 1 - जळगाव मुख्य डाकघर येथे कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता सर्व कर्मचा-यांची दिनांक 26 व 27 ऑगस्ट, 2020 रोजी कोवीड-19 चाचणी करण्यात आली. चाचणी केलेल्या 53 कर्मचा-यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मुख्य वैदयकीय अधिकारी, जळगाव शहर महानगरपालिका, जळगाव यांच्या सल्ल्यानुसार नवीन नियमांनुसार अत्यावश्यक सेवेत असलेल्या व अहवाल निगेटिव्ह आलेल्या कर्मचा-यांना गृहविलगीकरणाची आवश्यकता नसल्यामुळे जळगाव प्रधान डाकघर हे शनिवार दिनांक 29 ऑगस्ट, 2020 रोजी पूर्ववत सुरु करण्यात आले असून ग्राहकांना सर्व सेवा पुरविल्या जात आहेत. अशी माहिती पु. बा. सेलुकर, अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
काही वृत्तपत्रामध्ये जळगाव मुख्य टपाल कार्यालय क्वारंटाईन करण्यात आले असून 29 ऑगस्ट, 2020 रोजी बंद असेल अशा आशयाचे वृत्त प्रसिध्द करण्यात आले होते. या कार्यालयाव्दारे अशी कुठलीही माहिती देण्यात आली नव्हती. परंतु सदरचे वृत्त प्रसिध्द करण्यात आल्याने ग्राहकांमध्ये संभ्रमवस्था निर्माण होऊन ते डाक विभागाच्या सेवांपासून 29 ऑगस्ट, 2020 रोजी वंचित राहिलेत. तरी सर्व ग्राहकांना कळविण्यात येते की, जळगाव मुख्य डाकघर हे दिनांक 29 ऑगस्ट, 2020 पासून पूर्ववत सुरु असून ग्राहकांना सर्व सेवा पुरविण्यात येत आहेत. असे पु. बा. सेलुकर, अधीक्षक डाकघर, जळगाव विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment