कोरोनाच्या सव्वा लाखाहून अधिक चाचण्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7 हजार
जळगाव, (जिमाका) दि. 1 - जिल्ह्यात आज एकाच दिवशी (31 ऑगस्ट) रोजी 523 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत 19 हजार 736 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.53 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या 7 हजार 42 ॲक्टीव्ह रुग्ण विविध सेंटरमध्ये उपचार घेत असून पैकी 2814 रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत 1 लाख 27 हजार 312 संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ही दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे 65 हजार 814 तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे 61 हजार 498 अशा एकूण 1 लाख 27 हजार 312 तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी 98 हजार 428 चाचण्या निगेटिव्ह तर 27 हजार 591 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून 392 अहवाल प्रलंबित आहेत.
जिल्ह्यात सध्या 7 हजार 42 बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये 3 हजार 11 रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 572, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 645 रुग्ण उपचार घेत आहेत. तर 2 हजार 814 रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही 380 रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले 5 हजार 825 रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 217 इतकी आहे. यापैकी 549 रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून 181 रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे.
जिल्ह्यात आज एका दिवसात 456 पॉझिव्टिह रुगण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या 27 हजार 591 इतकी झाली आहे. यापैकी 19 हजार 736 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज एका दिवसात 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत 813 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा प्रथमच 2.95 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये 12 हजार 546 इतके बेड आहेत. यात 210 आयसीयू बेड तर 1 हजार 578 ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले बाधित रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 27 हजार 591 इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर 6253, जळगाव ग्रामीण 1503, भुसावळ 1579, अमळनेर 2283, चोपडा 2294, पाचोरा 1076, भडगाव 1270, धरणगाव 1301, यावल 893, एरंडोल 1540, जामनेर 1877, रावेर 1359, पारोळा 1366, चाळीसगाव 1660, मुक्ताईनगर 818, बोदवड 375, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या 144 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या
जळगाव शहर 4404, जळगाव ग्रामीण 886, भुसावळ 1105, अमळनेर 1579, चोपडा 1579, पाचोरा 844, भडगाव 1008, धरणगाव 938, यावल 764, एरंडोल 1207, जामनेर 1395, रावेर 987, पारोळा 789, चाळीसगाव 1174, मुक्ताईनगर 638, बोदवड 314, इतर जिल्ह्यातील 125 याप्रमाणे एकूण 19 हजार 736 रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले 7 हजार 42 ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर 1632, जळगाव ग्रामीण 560, भुसावळ 350, अमळनेर 640, चोपडा 664, पाचोरा 186, भडगाव 232, धरणगाव 328, यावल 71, एरंडोल 306, जामनेर 640, रावेर 250, पारोळा 564, चाळीसगाव 428, मुक्ताईनगर 118, बोदवड 54, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या 19 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या
जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान 813 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर 160, जळगाव ग्रामीण 57, भुसावळ 85, अमळनेर 64, चोपडा 51, पाचोरा 46, भडगाव 30, धरणगाव 35, यावल 47, एरंडोल 27, जामनेर 46, रावेर 70, पारोळा 13, चाळीसगाव 58, मुक्ताईनगर 17, बोदवड 7 मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या 813 रुग्णांपैकी 693 मृत्यु हे 50 पेक्षा जास्त वयोगटातील असून 401 मृत्यु हे आजारपण असलेले आहेत.
जिल्ह्यातील 3 हजार 173 ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 173 ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 1 हजार 257, शहरी भागातील 986 तर जळगाव महापालिका क्षेत्रातील 930 ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी 4 हजार 586 टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात 2 लाख 11 हजार 882 घरांचा समावेश असून यात 9 लाख 62 हजार 588 इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-19, जळगाव यांनी दिली आहे.
जिल्हावासियांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे - पालकमंत्र्यांचे जिल्हावासियांना आवाहन
जिल्ह्यातील नागरीकांनी कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच तातडीने आपल्या नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. तेव्हा नागरीकांनी शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment