जळगांव, दि. 25 (जिमाका वृत्तसेवा) – महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेतील प्रशिक्षण वर्गाना महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबईची शासन मान्यता आहे. तसेच MS-CIT या संगणक प्रशिक्षणासाठी हे अधिकृत प्रशिक्षण केंद्र म्हणून शासन मान्यता आहे. या संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील FICCI AWARD 1999 हा प्राप्त झालेला आहे. सन 2020-21 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणे सुरु आहे. माफक जागा असल्याने त्वरीत संपर्क साधावा.
प्रवेशासाठी नियम अटी व सवलती
अभ्यासक्रमाचे नाव :- सटिफिकेट इन कॉम्युटर ऑपरेशन वुईथ एम.एस.ऑफिस (संगणक कोर्स) इयत्ता 8 वी पास, मोटार ॲन्ड आमेंचर रिवायडींग, सबमर्सिबल पंप सिंगल फेज, (इलेक्ट्रीक कोर्स ) इयत्ता 9 वी पास, एम.एस. सी. आय.टी. (संगणक कोर्स), वयोमर्यादा – 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी -1 वर्ष, फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जातो.
सोई व सवलती :- प्रशिक्षण कालावधीत राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची मोफत सोय, अद्यावयत व परीपूर्ण संगणक कार्यशाळा, भरपूर प्रॅक्टीकल्स व व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षण, नेटवर्कीग व इंटरनेटची सुविधा, अनुभवी व तज्ञ निदेशक, उज्वल यशाची परंपरा, समाज कल्याण विभागाकडून स्वयंरोजगारासाठी व्यवसायासाठी बीज भांडवल योजना.
अर्ज केव्हा, कसे व कोठे करावेत :-प्रवेश अर्ज व माहितीपत्रक अधिक्षक, शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज ता. मिरज जि. सांगली पिनकोड-416410 नंबर-0233-2222908, मोबाईल 7972007456 / 9922577561 /9975375557 या पत्यावर पोस्ट व्दारे किंवा समक्ष मोफत मिळतील प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरुन फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरुन द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दिव्यांगत्व असल्याबाबतचे सक्षम अधिका-यांचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व आधार कार्ड यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत, प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ञ समिती व्दारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येईल. माफक जागा असल्याने गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन अधिक्षक, शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज, जि. सांगली यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment