Tuesday, 18 August 2020

करीअर मार्गदर्शन व कल चाचणीबाबत ऑनलाइन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

            जळगाव, (जिमाका) दि. 18 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाच्यावतीने जिल्‍ह्यातील युवक आणि युवतींसाठी दि. 24 ऑगस्ट, 2020 रोजी ऑनलाइन यशस्‍वी मुलाखत तंत्र मार्गदर्शन सत्राचे दुपारी 3.00 ते 4.30 या वेळेत आयोजन करण्यात आलेले आहे. अशी माहिती श्रीमती अनिसा ला. तडवी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.

            या ऑन लाईन उपक्रमाची लिंक Google Meet ॲपवर शेडयुल केलेली आहे. या मार्गदर्शन सत्रामध्ये सहभागी होण्यासाठी  https://meet.google.com/zwt-wfxb-iir  या लिंकवर जाऊन सत्रामध्ये सहभागी व्हावे. ऑनलाइन मार्गदर्शन सत्रात श्री आशुतोष साळी, यंग प्रोफेशनल, मॉडेल करीअर सेंटर, ठाणे  उमेदवारांना मुलाखतीची तयारी व इतर अनुषंगिक बाबींविषयी सविस्‍तर माहिती व मार्गदर्शन करणार आहेत.

            तरी जिल्‍ह्यातील जास्‍तीत जास्‍त उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.

00000

 

  

No comments:

Post a Comment