Monday, 17 August 2020

मका व ज्वारी पीकावरील किडरोग नियंत्रणासाठी 50 टक्के अनुदानावर किटकनाशके उपलब्ध

             जळगांव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) - मका व ज्वारी पिकावर अमेरीकन लष्कारी अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे. तसेच कापुस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो आणि तो म्हणजे अमावस्या. सर्व सजीव सृष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो. प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला एक दोन दिवस मागे पुढे म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळयाकु्ट्या रात्री असतात त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात. अमावस्येच्या 2 दिवस अगोदर फक्त सिलिकॉन स्टिकर आणि निमलेत किंवा निंबोळीयुक्त अर्काची फवारणी करा. आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांनी अंडीनाशक व अळी नाशकांची फवारणी करावी किंवा अळी अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारुन तिचा बंदोबस्त करावा.

            पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) सन 2020-21 अंतर्गत महाराष्ट्र कृषि उद्योग विकासमहामंडळ यांचेमार्फत आपत्कालीन परिस्थितीत कापुस, मका व ज्वारी या पिकांवरील विविध किडीसाठी- क्विनॉफॉस 20% एफ 25% ईसी या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे. सदरचे किटकनाशके महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत त्यांचे अधिकृत डीलरमार्फत करण्यात येणार आहे. सदरचे किटकनाशके पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. (रु 56.50 प्रति 250 मि.ली)

            यासाठी शेतक-यांनी त्यांचे नजीकचे कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी/तालुका कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच किटकनाशके अनुदानावर प्राप्त करुन घेण्यासाठी शेतक-यांनी संबंधित पिकांसाठी स्वयंघोषणापत्र सादर करुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत परमीट प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. सदर परवाना महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत त्यांचे अधिकृत डीलरकडे देउन 50 टक्के अनुदानावर किटकनाशके उचल करावयाची आहे.

            शासकीय योजना क्रॉपसॅप योजनेतंर्गत वितरकांकडे पुरवठा करण्यात आलेल्या निविष्ठांचा तपशील चाळीसगाव-मनोज फर्टिलायझर, पाचोरा-आदर्श के एसके, जामनेर-शेतकरी सह संघ, भडगाव-भडगाव फ्रुटसेल सोसायटी, जळगाव- लक्ष्मी ॲग्रो एजन्सीज, भुसावळ-जंगले अँड सन्स, यावल-खान्देश ट्रेडर्स, रावेर-एस के अग्रवाल, मुक्ताईनगर-तालुका कृषि अधिकारी, बोदवड-खंडेलवाल के एसके, अमळनेर-किरण अग्रो एजन्सीज, चोपडा-माऊली ट्रेडर्स, पारोळा-संजय कृषि केंद्र, एरंडोल-लक्ष्मी ॲग्रो एजन्सीज, धरणगाव-व्यंकटेश ॲग्रो एजन्सीज यांचेकडे उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment