जळगाव, (जिमाका) दि. 19 - महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण 34 अंगीकृत रुग्णालये असून या अंगीकृत रुग्णालयातून 837 कोविड व संशयित कोविड रुग्ण तर 4 हजार 844 नॉन-कोविड रुग्ण अशा एकूण 5681 रुणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या रुग्णांना 1 एप्रिलपासून आजतोपावेतो या योजनेच्या माध्यमातून एकूण 12.43 कोटी रुपयांचा लाभ राज्य शासनाने दिला आहे. अशी माहिती डॉ गोपाल जोशी, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे जळगाव जिल्हा समन्वयक यांनी दिली आहे.
आरोग्य क्षेत्रात रुग्णांना महागड्या उपचारासाठी स्वतः चे पैसे खर्च करावे लागतात, गरीब रुग्णांना नि:शुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी. या उद्देशाने शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना चालू केली आहे. 1 एप्रिलपासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजना राज्यामध्ये ई निविदा पद्धतीने निवड करण्यात आलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरंस कंपनीतर्फे राबविण्यात येत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रति कुटुंब प्रति वर्ष दीडलाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. तर प्रधान मंत्री जन आरोग्य योजना योजनेंतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. लाभार्थी कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला किवा अनेक व्यक्तीना या योजनेचा लाभ घेता येईल.
योजनेत समाविष्ट उपचार - योजनेंतर्गत 34 विशेषज्ञ सेवांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचार व शस्त्रक्रिया. एकत्रित योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सर्वसाधारण शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया, स्त्री रोगावरील शस्त्रक्रिया, अस्थिव्यंग शस्त्रक्रिया, हृदय शस्त्रक्रिया व उपचार, जठर व आतड्याच्या शस्त्रक्रिया व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया व उपचार, मेंदू व मज्जासंस्था यांचे आजारावरील शस्त्रक्रिया व उपचार, प्लास्टिक सर्जरी, जळीत रुग्णावरील उपचार, कृत्रिम अवयव, आकस्मिक वैद्यकीय उपचार, त्वचेच्या, सांध्याच्या व फुफ्फुसाच्या आजारावरील आकस्मिक उपचार, ऐनडोक्राईन, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजार व इंटरव्हेशनल रेडओलॉजी उपचार यांचा लाभ मिळतो.
या योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रुग्णालयातून नि:शुल्क वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. ही योजना पूर्णतः संगणकीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) तसेच फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयातून मोफत उपचार घेऊ शकतात. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयीन उपचार, निदानासाठी लागणाऱ्या चाचण्या, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन आणि परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रुग्णालयातून सुटी केल्यावर पाठपुरावा सेवा आणि 10 दिवसांपर्यंत गुंतागुंत झाल्यास त्याचे मोफत उपचार समाविष्ट आहेत.
जळगाव जिल्हात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत एकूण 34 अंगीकृत रुग्णालय आहेत. सर्व अंगीकृत रुग्णालयात रुग्ण-सहायतासाठी आरोग्यमित्र कार्यरत आहेत. योजनेतंर्गत कोविड किंवा संशयित कोविड अप्रुव्हड केसेस 721 तर इमरजँसी टेलिफोनिक इन्टिमेशनद्वारे 116 केसेस झाल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 837 केसेसमध्ये कोविड किंवा संशयित कोविड रुग्णांनी लाभ घेतला आहे. तसेच 4 हजार 844 नॉन-कोविड रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला आहे. अशाप्रकारे जळगाव जिल्ह्यातील रुग्णालयात 1 एप्रिल, 2020 ते आजतोपावेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत शासनाने रुग्णांना एकूण रु 12.43 कोटी रुपयांचा लाभ दिला आहे.
क्र. |
जळगाव जिल्हातील रुग्णालयात दि. १ एप्रिल २०२० ते आजतोपावेत मज्योफुजआयो अंतर्गत घेतलेला लाभ |
प्रकरण |
प्रकरण |
एकूण रक्कम |
|
1 |
कोविड किंवा संशयित कोविड |
अप्रुव्हड केसेस |
721 |
837 |
रु 1.68 करोड |
इमरजँसी टेलिफोनिक इन्टिमेशन केसेस |
116 |
||||
2 |
नॉन-कोविड केसेस |
4844 |
रु 10.74 करोड |
||
|
एकूण कोविड आणि नॉन-कोविड केसेस |
5681 |
रु 12.43 करोड |
23 मेच्या शासन निर्णयानुसार ही योजना 31 जूलैपर्यंत लागू करण्यात आली होती. यात पांढरी शिधापत्रिकाधारक सुद्धा या योजनेचे लाभार्थी आहेत. तसेच काही किरकोळ आजार तर काही मोठे आजार (उदा- डिलेव्हरी, सिजर डिलेव्हरी इत्यादी) व काही तपासण्या ज्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत सामाविष्ट नाही, अशा 67 उपचार पद्धती व तपासणीचा समावेश सर्व नागरीकांसाठी अंगीकृत रुग्णालयात लागू केलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने सध्या कोविड-19 च्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ तसेच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत राज्यातील नागरिकांना मिळत असलेला लाभ लक्षात घेता दिनांक 23 मे, 2020 रोजी अंमलात आलेल्या शासन निर्णयास तीन महिन्यांसाठी दिनांक 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत वाढ केली आहे.
अधिक माहिती साठी रुग्णालयातील प्रवेशद्वार जवळील मदत केंद्रात उपस्थित आरोग्य-मित्राशी संपर्क साधावा
माहिती व तक्रारीसाठी टोल फ्री संपर्क क्रमांक - 155388 & 1800 233 2200
उपचार पद्धतीची यादी www.jeevandayee.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. अशी माहितीही डॉ. जोशी यांनी दिली आहे.
योजने अंतर्गत जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालयांची यादी |
|
अ . क्र. |
अंगीकृत रुग्णालय |
1 |
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल जळगाव खुर्द |
2 |
अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जळगाव |
3 |
ऑर्चिड हॉस्पिटल जळगाव |
4 |
कांताई नेत्रालय जळगाव |
5 |
खडके एक्सिडेंट हॉस्पिटल जळगाव |
6 |
गायत्री हॉस्पिटल जळगाव |
7 |
जावळे हॉस्पिटल जळगाव |
8 |
जीवन ज्योती कॅन्सर हॉस्पिटल जळगाव |
9 |
डॉ. एजी भंगाळे नर्सिंग होम अँड हॉस्पिटल जळगाव |
10 |
प्रकाश चिल्ड्रन्स हॉस्पिटल जळगाव |
11 |
महाजन हॉस्पिटल जळगाव |
12 |
श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज हॉस्पिटल जळगाव |
13 |
श्री साई लीला एक्सिडेंट हॉस्पिटल जळगाव जळगाव |
14 |
संजीवनी रुग्णालय जळगाव |
15 |
सुलोचन रेटीना केअर हॉस्पिटल जळगाव |
16 |
कमल हॉस्पिटल जामनेर |
17 |
ग्लो. म. हॉस्पिटल जामनेर |
18 |
श्री एक्सीडेंट अँड ट्रामा केअर हॉस्पिटल अमळनेर |
19 |
धन्वंतरी हॉस्पिटल वरणगाव |
20 |
पुष्पा सर्जिकल अँड यूरोलॉजी हॉस्पिटल भुसावळ |
21 |
भिरूड हॉस्पिटल भुसावळ |
22 |
विश्वनाथ हॉस्पिटल भुसावळ |
23 |
साई पुष्पा हॉस्पिटल भुसावळ |
24 |
बाबजी जीवनदीप हॉस्पिटल चाळीसगाव |
25 |
सौ. शैलजा हॉस्पिटल चाळीसगाव |
26 |
श्री नृसिंह हॉस्पिटल चोपडा |
27 |
विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा |
28 |
आशीर्वाद हॉस्पिटल फैजपुर |
29 |
उपजिल्हा सामान्य रुग्णालय चोपडा |
30 |
ग्रामीण रुग्णालय धरणगाव |
31 |
सिव्हिल हॉस्पिटल जळगाव |
32 |
ग्रामीण रुग्णालय, पहूर |
33 |
उपजिल्हा सामान्य रुग्णालय जामनेर |
34 |
उपजिल्हा सामान्य रुग्णालय मुक्ताईनगर |
00000
No comments:
Post a Comment