जळगाव, (जिमाका) दि. 17 - शैक्षणिक वर्ष सन 2020-21 साठी डिप्लोमा इन इलिमेंटरी एज्युकेशन (डीएलएड) प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज भरणेबाबत सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयाची यादी शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे www.maa.ac.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
दिनांक 17/8/2020 पासून www.maa.ac.in या संकेत स्थळावर अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचा स्वत:चा ईमेल आयडी असणे बंधनकारक आहे. प्रवेश अर्ज शुल्क खुला संवर्ग रुपये दोनशे तर खुला संवर्ग वगळून अन्य संवर्गासाठी रुपये शंभर असे राहील. उमेदवारास एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज करावयाचा असेल तर प्रत्येक माध्यमात संवर्गानुसार स्वतंत्र आवेदन पत्र शुल्क भरावे लागेल.
प्रवेश अर्ज शुल्क स्वीकारण्याच्या पद्धती -प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन/paymentgateway/Ewallet स्वत: किंवा नातेवाईकाच्या क्रेडिटकार्ड, डेबिटकार्ड याद्वारे स्वीकारले जाईल. प्रवेश पात्रता- प्रवेशात इच्छुक असणारे कला वाणिज्य विज्ञान व एमसीवीसी शाखेतील पात्र उमेदवार -इयत्ता बारावी खुल्या संवर्गासाठी किमान 49.5 टक्के गुण व खुला संवर्ग वगळून अन्य संवर्ग संवर्गासाठी किमान 44.5 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन प्रक्रियेतील अर्ज भरणे बंधनकारक आहे. उमेदवारांना प्रवेश अर्ज भरताना तांत्रीक अडचणी आल्यास अशा अडचणी support@deledadmission.in या ईमेलवर पाठवाव्यात. प्रवेशाबाबतचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाईल. याबाबत वर्तमानपत्रात पुन्हा स्वतंत्र जाहिरात दिली जाणार नाही त्यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
D.el.ed प्रथम वर्ष ऑनलाइन प्रवेशाचे वेळापत्रक 2020-21
उमेदवारांनी ऑनलाइन आवेदन पत्र भरणे कालावधी - 17/8/20 ते 31/8/2020
DIET स्तरावर पूर्ण भरलेल्या आवेदन पत्राची ऑनलाइन पडताळणी करणे कालावधी - 17/8/20 ते 1/9/20
Objectioncummeritlist प्रसिद्ध करणे कालावधी - 4/9/2020
पूर्ण भरलेल्या अर्जांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे कालावधी - 7/9/2020
प्रथम फेरी प्रवेशाची यादी जाहीर करणे कालावधी -8/9/2020
प्रथम फेरीत उमेदवारांनी प्रवेश घेणे कालावधी - 8/9/2020 ते11/9/2020
प्रथम फेरीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी DIET कडे Login वर पाठवणे कालावधी - 11/9/2020
दुसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवारास बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्ण भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील कालावधी - 12/9/2020
दुसऱ्या प्रवेश फेरी यादी जाहीर करणे कालावधी - 14/9/2020
दुसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेणे कालावधी - 14/9/2020 - 17/9/2020
दुसऱ्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादीDIET कडे Login वर पाठवणे कालावधी - 17/9/2020
तिसऱ्या फेरीसाठी विकल्प देणे (उमेदवारास बदल करावयाचा असल्यास) अन्यथा पूर्वी भरलेले विकल्प ग्राह्य धरले जातील कालावधी - 18/9/2020
तिसरी व अंतिम प्रवेश फेरी यादी जाहीर करणे कालावधी - 20/9/2020
तिसऱ्या प्रवेश फेरीतील उमेदवारांनी प्रवेश घेणे कालावधी - 21/9/2020 - 24/9/2020
तिसऱ्या फेरीतील प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी DIET कडे Loginवर पाठवणे कालावधी - 24/9/2020
DIET प्राचार्यांनी जिल्ह्यातील अध्यापक विद्यालय निहाय झालेल्या प्रवेशाची खात्री करून घेणे कालावधी - 24/9/2020 - 26/9/2020 , प्रथम वर्ष सुरू दिनांक – 25/9/2020
प्रत्येक प्रवेश फेरीतील यादी जाहीर झाल्यापासून उपरोक्त ठरवून दिलेल्या कालावधीत उमेदवारांनी प्रवेश घ्यावा. वरील वेळापत्रक संभाव्य असून यामध्ये बदल करण्याचा अधिकार अध्यक्ष, राज्यस्तरीय डी एल एड प्रवेश निवड निर्णय व प्रवेश सनियंत्रण समिती, पुणे यांना राहील. असे संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणै यांनी केले कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment