जळगांव, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा) - जळगाव जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/विधवा यांना सुचित करण्यात येते की, विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 या वर्षासाठी देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरुपाचे लक्षणीय काम केलेले असेल. त्यांना एकरक्कमी दहा हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी पंचवीस हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. तर इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटकर विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे मार्फत दिला जातो.
पात्र माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनी या संधीचा लाभ घ्यावा व दिनांक 15 सप्टेंबर, 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment