जळगाव, दि. 11 (जिमाका) - राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडीत दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये १२ वी नंतरच्या व्यवसायिक अभ्यासक्रमान प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यवसायीक अभ्यासक्रम वगळून) प्रवेशीत असलेल्या व या योजनाचा लाभ घेण्यासाठी इच्छूक असलेल्या विद्यार्थ्यांना योजनांकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी १८ सप्टेंबर, २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे
या
योजनेचे अर्ज https://hmas.mahait.org या सकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्यात
यावे, असे आवाहन सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण योगेश पाटील यानी केले आहे.
000000000
No comments:
Post a Comment