Monday, 15 September 2025

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत बायोचार निर्मितीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

             जळगाव, दि. १५ ((जिमाका वृत्तसेवा)-  राष्ट्रीय अन्न्‍ सुरक्षा आणि पोषण अभियान वाणिज्यिक पिके अंतर्गत कापुस विकास कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत स्थानिक पुढाकाराच्या बाबी अंतर्गत बायोचार निर्मीती उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश  शेतातील पिकांच्या पऱ्हाटयांचा वापर करुन जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवणे व शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवणे हा आहे.  

            या घटकांतर्गत वैयक्तिक लाभार्थी नोंदणीराष्ट्रीय शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी तसेच कृषी क्षेत्रातील सहाकारी संस्था अर्ज करण्यास पात्र आहेत. गटाने प्राधिकृत सदस्यामार्फत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. लाभार्थी निवड प्रक्रिया प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर होणार असून, पात्र शेतकऱ्यांना प्रतियुनिट रु. १०.००० रुपये किंवा एकूण खर्चाच्या ५० टक्के पैकी जे कमी असेल त्या प्रमाणे अनुदान मिळणार आहे.

            शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना महाडीबीटी पोर्टलवरील फलेक्झी घटक या टॅबमध्ये बायोचार सदर निवडून अर्ज करावा.

            कृषी विभागामार्फत अधिकाधिक शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या घटकाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्य कार्यालयांशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

                       

000000000


 

No comments:

Post a Comment