जळगाव दि. 09 (जिमाका वृत्तसेवा):- तहसिल कार्यालय, भुसावळ येथे कार्यरत असलेले व नियत वयोमाना नुसार 28 फेब्रुवारी, 2025 रोजी सेवानिवृत्त झालेले ज्ञानेश्व्यर राजधर पाटील, सहायक महसूल अधिकारी, तहसील कार्यालय भुसावळ व्दारा - दिनेश मधुकर भामरे, केले नगर भाग 1, प्लॉट नं. 44 एस आर पी कॉलनी, देवपूर धुळे यांचे 26 जुलै, 2025 रोजी निधन झाले आहे.या बाबत समाज माध्यमांव्दारे या कार्यालयास माहिती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या कायदेशीर वारसांना सदरची नोटीस प्रसिध्द झालेपासून एक महिन्याच्या आत पुढे नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालय, भुसावळ येथे कार्यालयीन दिवशी व वेळी उपस्थित राहावे.
कार्यालयात
येतांना,सोबत अर्जदाराचा (कायदेशिर वारस ) पासपोर्ट आकाराचा फोटो, मयत कर्मचाऱ्याच्या
मृत्यूचा दाखल्याची मूळ व छायांकित प्रत, अर्जदाराचा (कायदेशीर वारस) ओळखपत्र आणि पत्याचा
पुरावा, वारस प्रमाणपत्र किंवा कुटूंबातील सदस्यांची यादी ( कुटुंब प्रमाणपत्र) व वारसांचे
संमतीपत्र, मयत कर्मचाऱ्याचे सेवा मूळ सेवा पुस्तक, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकच्या
पहिल्या पानाची प्रत ( ज्यात खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल),अशी कागद पत्र आणावीत, असे भुसावळ
तहसीलदार निता लबडे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००००००००००
No comments:
Post a Comment