Monday, 3 April 2023

शासकीय तंत्रनिकेतन येथे 10 एप्रिल रोजी भरती मेळावा

          जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 3- शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव येथे 10 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता शिकाउ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

          तरी सर्व ITI पास उमेदवारांनी  apprenticeshipindia.org  या वेबपोर्टलवर नावनोंदणी करावी व सदर भरती मेळाव्यास उपस्थित रहावे, असे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार  मुलभुत प्रशिक्षण तथा अनु. सुचना केंद्र व्दारा औदयोगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment