जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) :- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महाज्योती, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 12 एप्रिल, 2023 रोजी सायं 6.00 वाजता छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह, जळगाव येथे क्रांतीगाथा वाद्य वृंदाचा संगीतमय नजराणा समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन दिलीप केदार, पार्श्वगायिका आवाज महाराष्ट्राचा ज्योती चौहान, गायक सायबा, सचिन जावळे व संतोष चव्हाण हे आपल्या गीतांच्या माध्यमातून स्वर संगीताच्या साथीत सुरेल वंदन करणार आहेत.
या कार्यक्रमास जळगावकर नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment