जळगाव,
दिनांक 28 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा
जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी जळगाव
जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री
श्री. पाटील यांचा दौरा असा : शनिवार 29 एप्रिल, 2023 रोजी सकाळी 9.00 वाजता
पाळधी, ता. धरणगाव, जि.जळगाव येथूण प्रयाण. सकाळी 9.30 वा. बेळी, निमगाव व
नशिराबाद शिवार येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी. सकाळी
10.30 वा. चिंचोली परिसर येथे चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची
पाहणी. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) कडे प्रयाण. सकाळी 11.30 वा.
शासकीय विश्रामगृह, जळगाव (अजिंठा) येथे आगमन व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या
वारसांना धनादेश वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सोयीनुसार जळगाव येथून शासकीय वाहनाने
पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगावकडे प्रयाण, आगमन व राखीव.
00000
No comments:
Post a Comment