जळगाव, दि. 23 (जिमाका वृत्तसेवा) : युवक – युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयातर्फे स्वयंरोजगार सुरू करताना कोणती काळजी घ्याल? या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे शुक्रवार 24 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 3 ते 4.30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे.
स्वयंरोजगार सुरु करताना कोणती
काळजी घ्याल ? या मार्गदर्शन सत्रात प्रशिक्षक, लेखक विनोद अनंत मेस्त्री
मार्गदर्शन करतील. आरसेटी उस्मानाबादचे विकास गोफणे दुपारी 3.30 ते 3.55 वाजता मार्गदर्शन करतील.
दुपारी 4 ते 4.30 या कालावधीत प्रश्नोत्तरे होतील. या मागदर्शन सत्रात सहभागी
होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन
या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले
आहे.
फेसबुक
- https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब - https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A
00000
No comments:
Post a Comment